मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 5 ऑगस्ट 2020 (09:02 IST)

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना करोना

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना करोनाची लागण झाल्यानंतर आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. धर्मेंद्र प्रधान यांना उपचारासाठी हरियाणामधील गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अमित शाह यांनाही याच रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे.