शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 मार्च 2020 (23:02 IST)

सांगलीत एकाच कुटुंबातील २३ बाधीत

सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरात करोनाचे १२ नवीन रुग्ण आढळले असून जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या २३ झाली आहे. 
 
इस्लामपुरात आढळलेले करोनाचे सर्व रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. कुटुंबातील आधीच्या करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने या सर्वांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. इस्लामपुरातील त्या कुटुंबाच्या संपर्कातील आणखी बारा जणांना करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. सांगलीत करोना रुग्णांची संख्या २३ वर पोहचली आहे. 
 
प्रशासनाने या कुटुंबाचं घर असलेल्या परीसरातील ५०० मीटर अंतरावरील सर्व सीमा सील केल्या आहेत.