शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 मार्च 2020 (10:34 IST)

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत

करोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. करोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारांसाठी सरकारची मदत व्हावी यासाठी काही सामाजिक संस्था आणि सेलिब्रिटींनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. अशात सर्वांचा लाडका बाहुबली म्हणजेच दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासने आर्थिक मदतीचा हात पुढे वाढवला आहे. 
 
प्रभासने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. कोरोनाच्या रुग्णांच्या उपचारासाठी प्रभासने तब्बल ४ कोटी रुपयांच्या आर्थिक मदत केली आहे. प्रभासने ४ कोटी रुपयांपैकी ३ कोटी रुपये पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीच्या माध्यमातून दिले आहेत. तर उर्वरित ५०-५० लाख रुपये अनुक्रमे आंध्र प्रदेश आणि तेलंगना राज्याच्या मुख्यमंत्री मदतनिधीसाठी दिले आहेत.
 
दरम्यान, अनेक दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींनी त्यांच्या मदतीचा हात पुढे केला आहे.