शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 25 मार्च 2020 (13:12 IST)

Maruti, Mahindra, Hyundai मोटरचे उत्पादन बंद

करोना व्हायरसचा पसारा बघता संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. अशात जगभरातील ऑटो क्षेत्रासह भारतातील ऑटो क्षेत्रालाही फटका बसला आहे. भारतातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी Maruti Suzuki India आणि Mahindra & Mahindra ने यामुळे उत्पादन बंद करण्याची घोषणा केली आहे.
 
Kia Motors India, Mercedes-Benz, FCA, Hyundai Motor ने देखील देशातील कारचे उत्पादन बंद करण्यात आले आहे.
 
गेल्या आठवड्यात युरोप, अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सिको मध्ये ऑटोमोबाइल कंपन्यांनी आपले उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
Honda Cars India ने उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा आणि राजस्थानमधील तापुकरामधील आपले काम पुढील सूचना मिळे पर्यंत बंद केले आहे. मारुती सुजुकी इंडियाचे हरियाणातील गुरुग्राम आणि मानेसर मधील उत्पादन आणि कार्यालय बंद केल्याचे म्हटले आहे.
 
कंपन्यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत उत्पादन आणि कार्यालय बंद ठेवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.