सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 25 मार्च 2020 (09:49 IST)

अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी केलेल्या काही मोठ्या घोषणा

कोरोना व्हायरसच्या या संकटात सरकार सामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. या परिस्थितीत अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी सामान्यांसाठी एटीएम चार्जबाबत घोषणा केली आहे. पुढील तीन महिन्यापर्यंत कोणत्याही बँकेतील एटीएममधून पैसे काढल्यानंतर कोणताही चार्ज लावण्यात येणार नाही. डेबिडकार्ड धारक एटीएममधून कितीही वेळा पैसे काढू शकतो. त्यावर कोणताही चार्ज लावण्यात येणार नसल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
 
तसंच, बँक खातेधारकांना, आपल्या खात्यात मिनिमम बॅलेन्स ठेवण्यााबाबतही सूट देण्यात आली आहे. आता बँक खातेधारकांना, खात्यात मिनिमम बँलेन्स ठेवण्याची गरज नाही. कोरोनाच्या व्हायरसच्या वाढत्या रुग्णांमध्ये अनेक शहरांत लॉकडाऊनची स्थिती आहे. 
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले आणखी काही निर्णय -
- आर्थिक वर्ष 2018-19 साठी कर परतावा अर्थात इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख वाढवून ती 30 जून करण्यात आली आहे.
 
- मार्च, एप्रिल, मे महिन्यातील जीएसटी रिटर्न भरण्याची तारीख वाढवून 30 जून करण्यात आली आहे.
 
- आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीखही 30 जून 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
 
देशातील 32 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पूर्णपणे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर 560 जिल्ह्यात बंदी घालण्यात आली आहे. अनेक कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात आलंय. असं असलं तरी अनेक कंपन्या, कारखाने मात्र बंद आहेत. कच्च्या मालाचा पुरवठा होत नसल्याने, सरकारने लॉकडाऊनची घोषणा केल्याने कामकाज ठप्प झालं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सामान्यांसाठी सरकारकडून दिलास देण्यात आला आहे.