बुधवार, 19 नोव्हेंबर 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 19 नोव्हेंबर 2025 (16:09 IST)

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

मार्गशीर्ष महिना 2025
मार्गशीर्ष हा महिना भगवान श्रीकृष्ण, देवी लक्ष्मी आणि दत्तात्रेय यांचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो. याला “मोक्षदायक महिना”ही म्हणतात. यात केलेली प्रत्येक भक्ती, दान-जप-तप याचे अनंतपटीने फळ मिळते. या महिन्यात स्नान, दान आणि दिवे लावणे शुभ मानले जाते आणि ते पापांचा नाश करते.
 
मार्गशीर्षात रोज करावयाचे सोपे परंतु अत्यंत प्रभावी उपाय/कामे:
महालक्ष्मी व्रत: दर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करावी आणि उपवास ठेवावा, असे मानले जाते की यामुळे घरात सुख, समृद्धी आणि धन-संपत्ती येते. कलश स्थापना करून, देवीची कहाणी वाचावी आणि नैवेद्य दाखवावा.ALSO READ: श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा (गुरुवारची मार्गशीर्ष व्रत कथा)
 
श्रीकृष्णाची भक्ती: हा महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित मानला जातो, म्हणून त्याची पूजा, भजन आणि स्तोत्रे गाणे खूप शुभ आहे. 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा किंवा श्रीकृष्णाच्या इतर नामांचा जप करावा. भगवत गीता ग्रंथाचे वाचन करणे अत्यंत शुभ मानले जाते.
 
दत्तजयंती निमित्त: दत्तजयंतीपर्यंत विशेष गुरुवार व्रत करु शकता. दत्त मंत्र जप, श्री गुरुचरित्र पारायण आणि दत्तजयंती उत्सव साजरा करणे शुभ मानले जातले. यामुळे गुरुकृपा, संकट निवारण आणि मोक्षप्राप्ती होते.ALSO READ: दत्त जयंती विशेष रेसिपी : दत्तगुरूंना आवडणारी घेवड्याची भाजी
 
स्नान आणि दान: या महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि दानधर्म करणे लाभदायक मानले जाते. यामुळे पापांचा नाश होतो आणि सुख-समृद्धी मिळते. गरीब आणि गरजूंना अन्नदान करावे.
 
दीपप्रज्वलन: या महिन्यात दिवे लावल्याने पापांचा नाश होतो असे मानले जाते.
 
इतर कार्य
संपूर्ण महिनाभर सात्विक अन्न शिजवावे आणि ग्रहण करावे.
तुळशीला रोज सकाळी-संध्याकाळी दिवा लावावा आणि पंचोपचार पूजा करावी. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
या काळात विष्णु सहस्रनाम आणि गायत्री मंत्राचा जप करणे विशेष पुण्यकारक मानले जाते.
थोडक्यात मार्गशीर्ष महिन्यात भक्ती, पूजा, व्रत आणि दान या चार गोष्टींना विशेष महत्त्व दिले जाते.