मंगळवार, 19 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 19 नोव्हेंबर 2024 (18:15 IST)

Margashirsha 2024 मार्गशीर्ष महिन्यात काय करावे?

Margshirsh 2024 या महिन्यात रोज गीता पाठ करा. श्रीकृष्णाची यथाशक्ती पूजा करा. कान्हाला तुळशीची पाने अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकारा. मार्गशीर्ष महिन्यात विष्णुसहस्त्र नाम, भागवत गीता आणि गजेंद्रमोक्षाचे पठण करावे. या महिन्यात भगवान श्रीकृष्ण, श्री हरी आणि माँ लक्ष्मीची पूजा करावी. या महिन्यात सर्व गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि ज्या घरात तिची विधिवत पूजा केली जाते तेथे वास करते.
 
या व्यतिरिक्त या महिन्यात चंपाषष्ठी, मोक्षदा एकादशी, दत्त जयंती, संकष्टी चतुर्थी नाताळ हे सण येतात.
मार्गशीर्ष गुरुवार का करतात?
मार्गशीर्ष गुरुवारचा व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळला जाणारा व्रत आहे. असे म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मी-नारायणाची कृपा प्राप्त होते आणि देवी लक्ष्मीच्या कृपेनं सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्ती होत.
 
मार्गशीर्ष महिन्याला दुसरे नाव काय?
मार्गशीर्ष हा भारतीय पंचांगानुसार वर्षातील नववा महिना असून याला अग्रहायण किंवा अगहन असेही म्हणले जाते.
मार्गशीर्ष गुरुवार चे उद्यापन कसे करावे?
व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी पूजा-आरती- कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे. व्रताचे उद्यापन करावयाच्या दिवशी संध्याकाळी सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलवून त्यांच्यांत महालक्ष्मीस्वरूप जाणून त्यांना हळदी-कुंकु लावावे. मनोभावे नमस्कार करावा. नंतर पूजा, आरती, कहाणी करून प्रसाद म्हणून फळ, सौभाग्य म्हणून गजरा, व महालक्ष्मी व्रतकथा पोथीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी. यथाशक्ती भेटवस्तू देखील देऊ शकता. त्यांची ओटी भरुन मनोभावे नमस्कार करावा. प्रसाद म्हणून दूध किंवा इतर फराळ द्यावा.
मार्गशीर्ष महिन्यात काय खावे?
या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा. या महिन्यात नर्मदा, शिप्रा, यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे पुण्यकारक मानले जाते. या काळात गाई, कावळे, कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणे अत्यंत फलदायी असते. या महिनाभर दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते.