मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 25 मार्च 2020 (11:43 IST)

सांगली: एकाच कुटुंबातील 5 जणांना करोनाची लागण, आता रुग्णांची संख्या 9

सांगलीतल्या इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील 5 जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. 
 
इस्लामपूर येथे दोन कुटुंबातील चौघांना करोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं होतं. हे चारही जण हजहून आले होते. दोन्ही कुटुंबाला घरातच क्वॉरंटाइन करण्यात आले होते तसेच नंतर प्रशासानाने त्यांच्या कुटुंबाशी निगडीत 39 लोकांना इन्स्टिट्युटशनल क्वारंटाइन केले होते. यापैकी 5 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. हे पाचही जण एकाच कुटुंबातील आहे. 
 
हे लोक आणखी किती लोकांच्या संपर्कात आले होते, याचा शोध घेतला जात आहे. सांगतली नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे.
 
दरम्यान, राज्यात 23 नवीन करोना रुग्ण आढळले असून करोना रुग्णांची संख्या 112 वर पोहोचली आहे.