रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 25 मार्च 2020 (10:15 IST)

करोनाची माहिती देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटबोट सुविधा

सर्वसामान्यांना करोनासंबंधी माहिती मिळावी यासाठी राज्य सरकारकडून एक सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. करोनासंबंधी माहिती देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटबोट ही सुविधा राज्य सरकारकडून सुरु करण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकारने +912026127394 हा क्रमांक दिला आहे. हा क्रमांक आपल्या फोनमध्ये सेव्ह करावा. या ग्रुपमध्ये आल्यानंतर करोनासंबंधी आपल्या मनातील जे प्रश्न, शंका असतील त्यांची माहिती मिळेल असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आङे. सध्या ही सुविधा इंग्रजीत असून मराठीत आणण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करु असंही यावेळी ते म्हणाले.