1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : मंगळवार, 24 मार्च 2020 (20:35 IST)

संपूर्ण देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

21 days lockdown
कोरोना व्हायरसच्या संदर्भात जनतेशी संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री 12 वाजेपासून पूर्ण देशात लॉकडाउन केल्या जाण्याची घोषणा केली आहे. 
 
मोदीं म्हटलं की याची आर्थिक किंमत देशाला मोजावी लागणार आहे तरी देशातील प्रत्येक नागरिकाचा जीव वाचवणे सरकारची सर्वात मोठे प्राधान्य आहे. जो जिथे असेल त्याने तिथेच रहावे. हे लॉकडाउन 21 दिवसांसाठी असेल. हे 21 दिवस सर्वांसाठी महत्त्वाचे आहे.
 
हेल्थ एक्सपर्ट प्रमाणे कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी हे 21 दिवस अत्यंत महत्तवाचे आहे. जर हे 21 दिवस पालन करण्यात नाही आलं तर संपूर्ण देशासाठी अत्यंत त्रासदायक ठरतील. हे मी एक पंतप्रधान म्हणून नव्हे तर आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून विनंती करत आहे.
 
या लॉकडाउनमुळे आता घराच्या उबंरठ्यावर लक्ष्मण रेषा खेचली गेली आहे असे समजावे. या बाहेर टाकलं जाणारं एक पाऊल देखील स्वत:चा जीव धोक्यात टाकण्यासारखं आहे.
 
को- कोई
रो- रोड़ पर
ना- ना निकलें
 
मोदींनी कोरोनाचं हे शाब्दिक अर्थ देखील एका बोर्डाद्वारे समजावले.