1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 19 मार्च 2020 (21:04 IST)

येत्या 22 मार्च रोजी देशात ‘जनता कर्फ्यू’ ची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसची लागण होत असलेल्या परिस्थितीवर सुरक्षेसाठी देशवासीयांकडे जनता कर्फ्यूची मागणी केली आहे. 22 मार्चला सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत कुणीही बाहेर पडू नये असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. 
 
जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध, त्याचे पालन प्रत्येक नागरिकाने करावे अशी मागणी मोदींनी केली आहे. राज्य सरकारांनीही हा आदेश पाळावा असंही मोदींनी म्हटलं आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. 
 
22 मार्च रोजी देशातील 130 कोटी भारतीयांना आपल्या घरात राहावे अशी मागणी मोदींनी देशवाश्यांकडे केली आहे. 
 
अद्याप करोनावर कोणतीही लस शोधण्यात आलेली नाही. तसंच काही उपायही शोधण्यात आलेला नाही. त्यामुळे देशवासियांची चिंता वाढणं स्वाभाविक आहे. आपल्या देशावर आलेलं हे संकट साधंसुधं नाही तरी भारत सरकार या स्थितीबाबत नजर ठेवून आहे. प्रत्येकाने संयमाने वागलं पाहिजे आणि निर्देशांचं पालन करावं, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
 
करोना महायुद्धाच्या वेळेत असलेल्या काळाहूनही कठिण काळ असल्याचं मोदी म्हणाले. जागतिक महामारी असलेल्या करोनामुळे निश्चिंत होण्याची ही वेळ नाही. प्रत्येक भारतीयाने सजग राहणं आवश्यक आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. तसेच मोदींनी अशा परिस्थितीत ही लोकांच्या मदतीसाठी धावणार्‍यांचे आभार देखील मानले.