पंतप्रधान मोदींच्या पावलांवर पाऊल, अमृता फडणवीसही सोशल मीडिया सोडणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. मोदींच्या या ट्विटला भाजप नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी रिट्विट करत आपणही या मार्गाने जाणार असल्याचं म्हटलं आहे (Amruta Fadnavis Tweet). त्यामुळे मोदींच्या पावलांवर पाऊल ठेऊन अमृता फडणवीसही सोशल मीडिया सोडण्याची शक्यता आहे.
“काही वेळेला एक लहान निर्णयही आपलं आयुष्य बदलून टाकतो. मी माझ्या नेत्याने ठरवलेल्या निर्णयाच्या मार्गाने जाणार”, असं अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे (Amruta Fadnavis Tweet).