मोदींनी एक अनोखं आवाहन केलं नागरिकांना
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला संबोधित करताना अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोदींनी एक अनोखं आवाहन नागरिकांना केलंय.
२२ मार्च रोजी मला तुमच्याकडून आणखी एक सहकार्य हवंय. गेल्या दोन महिन्यांपासून लाखो जण रुग्णालय, कार्यालय, रस्त्यारस्त्यावरील गल्ल्यांत आपलं काम चोखपणे बजावत आहेत. त्यामध्ये डॉक्टर, नर्स, रुग्णालयाचे कर्मचारी, एअरलाईन्सचे कर्मचारी, सरकारी कर्मचारी, पोलीस कर्मचारी, मीडिया कर्मचारी, रेल्वे, बस, ऑटो सुविधा पुरवणारे, डोम डिलिव्हरी करणारे अशा अनेक जणांचा समावेश आहे. हे लोक करोना संक्रमणाचा धोका पत्करत दुसऱ्यांना सेवा पुरवत आहेत, आपलं कर्तव्य निभावत आहेत, असं म्हणत मोदींनी नागरिकांना या प्रत्येकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी दिली.
करोनासारख्या आपत्तीवेळी हेच लोक देशाची शक्ती बनून लढत आहेत. देशातील अशा सर्व छोट्या मोठ्या व्यक्तींचा आणि संघटनांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. २२ मार्च रोजी रविवारी आपण अशाच लोकांना धन्यवाद अर्पण करू, असं सांगताना ही कृतज्ञता कशी व्यक्त करायची हेदेखील पंतप्रधान मोदींनी सांगितलं.