शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 मार्च 2020 (12:55 IST)

या प्रकारे वाढवा आपली रोग प्रतिकारकशक्ती

कोरोनाच्या वाढत्या धोक्यात आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची हे माहीत असणे गरजेचे आहे. जगभरात कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. डॉक्टर आणि वैज्ञानिकांप्रमाणे रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्याने कोरोनाचा धोका वाढतो. आपली रोग प्रतिकारक शक्ती आपले बऱ्याच रोगांपासून आपले रक्षण करते. आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्यास रोगाचा आपल्या शरीरांवर नियंत्रण होतो. 
 
जे लोक अनेकदा आजारी पडतात त्याचा अर्थ आहे त्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होय. रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या मुलांना हवामानच्या बदलण्याने लगेच सर्दी, पडसे, ताप या सारख्या समस्यांना सामोरा जावे लागते. 
 
रोग प्रतिकारक शक्ती अनेक प्रकारांच्या जिवाणू संक्रमण, फंगस संक्रमणापासून संरक्षण करते. ह्याचा वरून हे सिद्ध होते की रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्यास आजारी पडण्याची शक्यता वाढते. तसेच मुलांमध्ये संसर्ग पसरण्याचा धोका जास्त असतो. मुलांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे 4 मुख्य टिप्स आहे जाणून घ्या काय केल्याने मुलांची प्रतिकारक शक्ती वाढेल.
 
* रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी चांगली झोप घेणे आवश्यक आहे. रात्री उशिरा पर्यंत जागल्याने आपली प्रतिकारशक्ती कमी होत जाते. मुलांना कमीत कमी 9 तासांची झोप घेणे आवश्यक आहे.
 
* बहुतांश आजार अन्नामुळे होतात. खान-पान व्यवस्थित नसल्यास शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते. त्यामुळे साथीच्या रोगांचा धोका वाढवू लागतो. बाहेरचे खाद्य पदार्थ, जॅक फूड, पॅकबंद ठेवलेले पदार्थ, गोड पदार्थांचा जास्त सेवन केल्याने मुलांची रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते.
 
* डॉक्टर नेहमीच सांगतात की काहीही खाण्याचा पूर्वी आपण आपले हात स्वच्छ धुवावेत. मुलांनी काहीही खाण्याचा पूर्वी आपले हात धुऊनच खावे. सर्व जंतू आणि विषाणू हाताच्या माध्यमाने आपल्या शरीरात पोहोचतात. असे होऊ नये हे टाळण्यासाठी आपल्या मुलांना काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुण्याची चांगली सवय लावा.
 
* ताण तणाव हे माणसाला आतून पोकळ करते. काही पालक अभ्यासासाठी किंवा इतर गोष्टींसाठी मुलांना हुणावतात अशाने त्यांचा मनावर ताण येते आणि ते ताण तणावाचे बळी पडू शकतात. मुलांना कोणत्याही प्रकाराच्या ताणापासून मुक्त ठेवल्यास त्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढेल.
 
हार्वर्ड विद्यापीठाचे आधुनिक औषधांवर अभ्यास करणारे डॉ. विलियम ली यांनी काही पदार्थाचे वर्णन केले आहे की मानवातील पाच प्रमुख संरक्षण प्रणाली (रोग प्रतिकारक शक्ती, स्टेम सेल्स, डीएनए, आतड्यामधील चांगले जिवाणू आणि रक्तवाहिन्या) रोगांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी रामबाण उपाय असू शकते. 
 
त्यांचा असं विश्वास आहे की या पाच संरक्षण प्रणाली आपल्या शरीरावर बाह्य होणारे दुष्परिणामांपासून संरक्षण करतात. कोणत्या कारणास्तव ज्यावेळी या संरक्षण प्रणालीवर दबाव येते तेव्हा रोग आपल्यावर आक्रमण करून आपल्याला रोगग्रसित करतो अश्या वेळेस आपण आपल्या सकस आणि चांगल्या आहाराने या संरक्षण प्रणालीस बळकट ठेवू शकतो आणि सुरुवातीच्या काळात कर्करोग होण्यापूर्वी डिमेंशियाला हरवू शकतो.
 
डॉ. ली यांनी 30 वर्षाच्या वैद्यकीय संशोधनानंतर आणि 700 हून अधिक अध्ययनानंतर हे सिद्ध केले आहे.
 
कर्करोग तज्ज्ञ डॉ.सुबीर जैन म्हणतात की संतुलित आहार, नियमित व्यायाम, उच्च प्रथिनेयुक्त आहार, व्हिटॅमिन सी, मल्टी व्हिटॅमिन, मल्टी मिनरल, अमीनो ऍसिड, ओमेगा 3, फॅटी ऍसिड, तसेच प्राणायाम, श्वासोच्छ्वास नियंत्रण, अनुलोम विलोम, भ्रस्तिका, कपाळ भाती या सारखे व्यायाम करून आपण चांगली रोग प्रतिकारक शक्ती मिळवू शकतो.