सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जुलै 2020 (08:55 IST)

अभिनेत्री मयुरी देशमुखच्या नवऱ्याने केली आत्महत्या

मराठीतील छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मयुरी देशमुखच्या नवऱ्याने आत्महत्या केली आहे. अभिनेता आशुतोष भाकरे याने 'भाकर' आणि 'इचार ठरला पक्का' सिनेमातून काम केलंय. नांदेडमध्गये राहत्या घरी त्याने गळफास लावून त्यानं आपलं आयुष्य संपवलं. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाहीय. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. 
 
गेले काही दिवस तो तणावातून जात होता. काही दिवासांपुर्वी त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये लोकं आत्महत्या का करतात ? हा आशय होता. पण आशुतोष या निर्णयापर्यंत जाईल असा कोणी अंदाज लावला नव्हता. २१ जानेवारी २०१६ ला मयुरी आणि आशुतोष यांनी लग्न केलं. अभिनेत्री मयुरी देशमुख ही खुलता खळी खुलेना या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचली.