शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 4 जुलै 2020 (19:58 IST)

बिग बॉस फेम अनिल थत्ते यांना कोरोना, व्हिडीओ शेअर करत सांगितले

बिग बॉस फेम अनिल थत्ते यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. खुद्द अनिल थत्ते यांनीच एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. ‘सध्या मी रुग्णालयात असून मला कोरोनाची लागण झाली आहे. गेले अनेक दिवस कोरोनाची लागण होऊ नये यासाठी मी वर्क फ्रॉम होम करत होतो. परंतु, आज तो व्हायचा तेव्हा होणार तेव्हा होतोच या निष्कर्षाला मी आलो. एवढी काळजी घेऊनही जर कोरोना होणार असेल तर काय म्हणायचे. आता कोरोनाची भीती संपली. तसेच कोरोना सोबत मधुमेह वगैरे अन्य आजार असूनही प्रकृती उत्तम असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले’, असे ही ते पुढे म्हणाले आहे. तसेच आजारातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर प्लाझ्मा देण्याचाही संकल्प केला असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.