शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 4 जानेवारी 2020 (13:18 IST)

अभिताभ यांनी शेअर केला रिंकू राजगुरूच्या चित्रपटाचा ट्रेलर

बॉलीवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांनी सर्वांची लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या 'मेकअप' चित्रपटाचा ट्रेलर त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर रिलीज झाल्यावर मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत या चित्रपटाबद्दल चर्चा सुरू आहे.
 
रिंकू या चित्रपटात दोन वेगवेगळ्या भूमिकेत दिसत आहे. घरात संस्कारी, सोज्वळ, लाजाळू पूर्वी बाहेर निघताच निर्भीड, बिनधास्त आणि स्वत:च्या मनाप्रमाणे वागणारी दिसत आहे. चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर पाहून रिंकूच्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
 
या चित्रपटात अभिनेता चिन्मय उदगीरकर रिंकूसोबत दिसणार आहे. चिन्मय डॉक्टरच्या भूमिकेत दिसून येत आहे. गणेश पंडित यांनी या चित्रपटाच्या निमित्तानं दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. चित्रपटाचं लेखनही त्यांनीच केलं आहे. चित्रपटाची निर्मिती दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग यांनी केली आहे. तर केतन मारू, कलीम खान सहनिर्माता आहेत. येत्या वर्षी 7 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटी येणार आहे.