मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 24 डिसेंबर 2019 (13:30 IST)

'भोंगा'ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार प्रदान

66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे उपराष्ट्रपती ए. व्यंकय्या नायडू याच्या हस्ते वितरण करण्यात आले. 'भोंगा' या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच 'पाणी', 'नाळ', 'चुंबक', 'तेंडल', 'खरवस' आणि 'आई शप्पथ' या मराठी चित्रपटांनाही विविध श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले. मराठी चित्रपटांसाठी एकूण 10 पुरस्कार प्रदान करणत आले.
 
'नाळ' चित्रपटातील उत्तम अभिनाकरिता श्रीनिवास पोकळे यास सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा तर प्रसिध्द अभिनेते स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्तम सहकलाकाराचा पुरस्कार प्रदान करणत आला.
 
प्रादेशिक भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. मराठी भाषेसाठी 'भोंगा' या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. या चित्रपटाचे दिग्दर्शक तथा मंदार- नलिनी प्रॉडक्शनचे शिवाजी लोटन पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रजत कमळ आणि 1 लाख रुपे असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

आदिनाथ कोठारे दिग्दर्शित आणि पर्पल पेबल पिक्चर्स निर्मिती 'पाणी' चित्रपटाला पर्यावरणावरील सर्वोत्तम चित्रपटाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.