शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 24 डिसेंबर 2019 (12:20 IST)

बहुप्रतीक्षित लिवा मिस दिवा २०२०ला महत्वाकांक्षी दिवांचा भरघोस प्रतिसाद…!

महालक्ष्मी मुंबई इथे पार पडली अंतिम फेरी!
 
आठव्या आवृत्तीत देशभरातील अनेक इच्छुक युवतींनी परीक्षा देऊन सौंदर्य स्पर्धा असलेल्या लिवा मिस दिवा २०२० स्पर्धेत भाग घेतला आहे.
 
दिल्ली, बेंगळुरू, जयपूर, चंदीगड, पुणे, इंदूर, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि लखनऊ या दहा शहरांतून झाल्यानंतर बहुप्रतिक्षित मुंबईत महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओ येथे ऑडिशनची अंतिम फेरी झाली. गेल्या काही दिवसांपासून, संपूर्ण देशभरात इच्छुक दिवांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
 
अंतिम फेरीसाठी जज २००० सालची मिस युनिव्हर्स लारा दत्ता होती आणि मेंटॉर सृष्टी सावनी- अध्यक्ष आणि ग्लोबल ब्रँड डायरेक्टर, पल्प अँड फाइबर बिझिनेस, आदित्य बिर्ला ग्रुप, नताशा ग्रोव्हर - ब्रँण्ड अँड ऑपरेशन्स हेड- मिस इंडिया ऑर्गनायझेशन, वर्तिका सिंग- मिस दिवा युनिव्हर्स 2019, शेफाली सूद - मिस दिवा सुपरानॅशनल २०१९, लुबना अ‍ॅडम्स - फॅशन कोरिओग्राफर, रानीमोल- हेड टाइम्स टॅलेंट मोनेटायझेशन.
 
१९ फायनलिस्ट आणि लिवा वाईल्डकार्ड एन्ट्री असलेल्या स्पर्धकांचा निकाल जजेस स्कोअर आणि ऑनलाईन वोटिंग द्वारे मूल्यमापन करून ३० डिसेम्बरला घोषित करण्यात येईल. त्यांत चार शहरांमध्ये मीडिया दौरे आणि ग्रूमिंग सेशन घेतले जातील.
 
यावेळी बोलताना मेंटॉर लारा दत्ता म्हणाली,“LIVA मिस दिवा २०२० च्या अलीकडच्या हंगामात परत येणे खरोखर आनंददायक आहे. आम्ही नेहमीच जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यास पात्र असलेल्या स्पर्धकांच्या शोधात आहोत. प्रत्येक वर्षाप्रमाणे मीही या लक्षवेधक तरुण स्त्रियांना भेटण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहे ज्या आपल्या अविश्वसनीय उद्दीष्टांना साध्य करण्यासाठी प्रेरित आहेत. आशा आहे की येथे त्यांना नक्की यश मिळेल.”