सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. जागतिक महिला दिन
Written By
Last Updated : शनिवार, 22 फेब्रुवारी 2020 (09:25 IST)

देशातील 25 सक्षम महिलांची यादी जाहीर, नवनीत राणा यांना पहिल्या पाचमध्ये स्थान

फेम इंडिया मासिक आणि आशिय पोस्ट सर्व्हे यांनी नुकतंच देशातील 25 सक्षम महिलांची यादी जाहीर केली आहे. यात अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना पहिल्या पाचमध्ये स्थान मिळाले आहे. तर बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिचाही या यादीत समावेश आहे.
 
दरवर्षी फेम इंडिया मासिक आणि आशिया पोस्ट सर्व्हे देशातील 25 सक्षम महिलांची यादी जाहीर करते. समाजातील स्थान, व्यक्तीचा प्रभाव, त्यांची प्रतिमा, त्यांचं उद्दिष्ट या सर्व बाबींचा विचार ही यादी जाहीर करताना केला जातो. यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील लोकांची मतं विचारात घेतली जातात. समाजसेवा, खेळ, पत्रकार, राजकारण, कला यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांना या यादीद्वारे गौरवण्यात येते. ज्या व्यक्तींनी गेल्या वर्षभरात महिला सबलीकरण आणि देशसेवेसाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, अशा व्यक्तींचा या यादीत समावेश असतो.

सक्षम महिलांची यादी  
 
1. भानुमती नरसिम्हन – आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या अध्यक्षा
2. पी. व्ही. सिंधू – जागतिक बॅडमिंटनपटू
3. रुपा झा – बीबीसी इंडियाच्या अनेक भाषांच्या प्रमुख
4. महुआ मोइत्रा – तृणमूल कांग्रेसच्या खासदार
5. नवनीत राणा – महाराष्ट्रातील अपक्ष खासदार
6. स्वाती मालीवाल – दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा
7. रूहानी सिस्टर्स – कला क्षेत्र
8. मल्लिका नड्डा – हिमाचल प्रदेशात समाजसेवेत सक्रीय
9. रुबिका लियाकत – एबीपी न्यूजच्या निवेदक
10. सीमा राज – वरिष्ठ आइआरएस ऑफीसर
11. सोनिया सिंह – राज्यसभा टीव्ही आणि बिजनेस पत्रकार
12. सोनल गोयल – आइएएस अधिकारी
13. डॉ.हेमलता एस. मोहन – प्रख्यात शिक्षण आणि संस्कृत तज्ज्ञ
14. सीमा समृद्धि – सर्वोच्च न्यायालयाच्या वकील
15. शिवांगी – देशातील पहिली नौदल लेफ्टनंट
16. डॉ.बरखा वर्षा – बाल कल्याण आणि महिला सबलीकरण
17. तान्या शेरगिल – भारती
 
य सैन्याच्या कॅप्टन
18. योगिता भयाना – प्रख्यात समाजसेविका आणि बलात्कारविरोधी इन इंडिया चळवळीचे जनक
19. शीला ईरानी – पोलीस आयुक्त
20. निशि सिंह – नाद फाऊंडेशनच्या संस्थापक
21. सारिका बहेती – जल संरक्षण क्षेत्रात काम
22. कुमुद सिंह – संपादक
23. डॉ.मानसी द्विवेदी – कवयित्री
24. डॉ. शिखा रानी – चिकित्सा, समाजसेवा आणि साहित्यलेखन