शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. नैवैद्य
Written By

Coconut Ladoo गणपतीच्या नैवेद्यासाठी नारळ रव्याचे मऊ लाडू

naral rava ladu
साहित्य 
पाव किलो जाड रवा, सव्वा वाटी नारळाचा चव, पाव किलो साखर, अर्ध्या वाटीपेक्षा थोडे कमी साजूक तूप, पाव वाटी दूध, पाच वेलदोड्यांची पूड, आवडीप्रमाणे काजू-बदाम किंवा किसमिस दोन टेबलस्पून, साखरेच्या निम्मे पाणी.
 
कृती 
तूपावर रवा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यावा. पाव वाटी दूध शिंपडून पुन्हा भाजावा. आता नारळाचा सव्वा वाटी चव घालून भाजण्यास सुरुवात करावी. रवा फुलू लागेल व कोरडाही होऊ लागेल त्यावेळी परातीत हे मिश्रण काढून घ्यावे. त्याच कढई किंवा पातेल्यात आता पाक करण्यास ठेवावा. मापाचे पाणी व साखर एकत्र करून मध्यम आचेवर ठेवावे. सतत ढवळत रहावे. दीडतारी पाक करावा, त्यात वेलदोडापूड, सुके मेवे घालून नंतर रवा व नारळाचे मिश्रण घालावे. व्यवस्थित ढवळून झाकून ठेवावे. एक तासाने पुन्हा ढवळून लाडू बांधून घ्यावे.