Paneer Coconut Ladoo केवळ 15 मिनिटात तयार होतील लाडू
गणपतीला लाडू अत्यंत प्रिय आहे. आपण वेगवेगळ्या प्रकाराचे लाडू करुन गणपतीला नैवेद्य दाखवू शकता. गणपतीची तयारी करताना आपल्याला झटपट तयार करण्यासारखी रेसिपी आहे पनीर नारळाच्या लाडवाची. तर जाणून घ्या सोप्या पद्धतीने कसे तयार करता येतील लाडू.
पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम करा. त्यात एक वाटी पनीर घाला. दोन मिनिट हलवत राहा. आता त्या अर्धा वाटी किसलेलं नारळ घाला. आपण बुरा खोपरा देखील वापरु शकता. यात लागत-लागत दूध मिसळा. चांगल्याप्रकारे मिसळून 5 मिनिट सतत हालवत शिजवा. यात आवडीप्रमाणे अर्धा चमचा वेलची पूड मिसळा. मिश्रर घट्ट होईपर्यंत हालवत राहा. मिश्रण जरा गार झाल्यावर त्याचे एक सारखे गोळे तयार करा.
आपल्या आवडीप्रमाणे आपण त्या मिश्रणातून दोन चमचे मिश्रण दुसर्या बॉऊलमध्ये काढून त्यात दुधात भिजवलेल्या केशर्याच्या काड्या आणि सुके मेव्याचे काप मिसळून त्याचं स्टफिंग लाडवात भरु शकता.
नंतर त्यावर गुलाब पाणी शिंपडून काप केलेला सुक्या मेव्याने सजवून देवाला नैवैद्य दाखवावा.