रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. नैवैद्य
Written By
Last Updated : बुधवार, 4 सप्टेंबर 2024 (08:15 IST)

Ganesh Chaturthi Naivedya राघवदास लाडू

ladoo
साहित्य - तीन वाट्या बारीक रवा, दीड वाटी दूध, एक वाटी साजूक तूप, दोन टी स्पून पातळ तूप, अडीच वाट्या पिठीसाखर, 7-8 वेलदोड्यांची पूड, थोडी जायफळपूड, थोडे बदामाचे पातळ काप, थोडा बेदाणा, केशर व 7-8 मऊ पेढे.
 
कृती - रव्याला एक वाटी दूध व पातळ तूप चोळून ठेवावे. नंतर मिक्सरमधून काढावे. साजूक तूपावर रवा मंद आचेवर भाजून घ्या. नंतर खाली उतरवून त्यावर उरलेले दूध गरम करून शिंपडावे. पिठीसाखर, वेलदोडापूड, जायफळपूड, बदामाचे काप, बेदाणा, केशर व मऊ पेढे घालून मिश्रण सारखे करावे. व लाडू वळावेत.