गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

श्रावण नैवेद्य स्पेशल आंब्याचे लाडू रेसिपी, लिहून घ्या

Mango
श्रावण हा पवित्र महिना सुरु होणार आहे. श्रावणात प्रत्येक सोमवारी भगवान शंकरांना रुद्राभिषेक केला जातो प्रत्येक महादेव भक्त श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतो. तसेच काही भक्त सोमवारचे व्रत ठेवतात. यादरम्यान भगवान शंकरांना वेगवगेळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात. तुम्हाला देखील नैवेद्यासाठी काही वेगळे, चविष्ट, गोड बनवायचे असेल ना तर ट्राय करा आंब्याचे लाडू. हे लाडू बनवणे अगदी सोप्पे आहे. तर चला लिहून घ्या रेसिपी 
 
साहित्य-
अर्धा कप आंब्याचा पल्प 
अर्धा काप कंडेस्ड मिल्क 
एक कप नारळाचा किस 
एक चमचा वेलची पूड 
अर्धा कप वाळलेला सुख मेवा 
 
कृती-
एका पॅनमध्ये नारळाचा किस टाकून भाजून घ्यावा. यानंतर त्यामध्ये आंब्याचा गुदा, कंडेस्ड मिल्क, सुखा मेवा, वेलची पूड चांगल्याप्रकारे मिक्स करावी. व परतवावे जेणे करून थोडे घट्ट होईल. आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर हात तूप लावून याला लाडूचा आकार द्यावा. आता एका ताटलीत नारळाचा किस टाकून हे लाडू ठेवावे. तर चला आपले चविष्ट आंब्याचे लाडू तयार आहे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik