1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: शनिवार, 29 जून 2024 (15:51 IST)

रव्याचा शिरा खाऊन कंटाळा आला ना, तर ट्राय करा तीन प्रकारच्या शिरा रेसीपी

how to make cilantro veena
अनेक लोकांना जेवण झाल्यानंतर किंवा जेवण करतांना गोड खूप आवडते. तसेच भारतीय प्रसादांमध्ये रव्याचा शिरा हा एक नंबरला असतो. पण कधी कधी हा च रव्याचा शिरा खाऊन कंटाळा येतो. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तीन प्रकारच्या शिऱ्याची रेसीपी. तर चला लिहून घ्या.
 
1. सीताफळ शिरा
साहित्य-
किसलेले दोन सीताफळ 
एक कप दूध 
शुद्ध तूप 1/4 
वेलची पूड 1/4 
बारीक कापलेले मेवे 
साखर 
 
कृती-
पॅनमध्ये तूप गरम करून घ्यावे. त्यामध्ये सीताफळ घालून पाच ते सात मिनिट परतवावे. सीताफळ  मऊ झाल्यानंतर त्यामध्ये दूध घालावे. तसेच सतत हवेत राहावे नंतर साखर घालावी व वेलीची पूड घालावी. हे मिश्रण काही काळ परत हलवावे. मग मेवे घालून गार्निश करावे व गरमगरम सर्व्ह करावा. 
 
2. बीटाचा शिरा 
साहित्य-
किसलेले दोन बिट 
फुल क्रिमी दूध दोन कप 
तूप चार चमचे 
मेवे 
वेलची पूड 
साखर 
 
कृती-
एका पॅनमध्ये तूप घालावे व गरम झाल्यानंतर त्यामध्ये किसलेले बिट घालावे. व पाच ते सहा मिनिट शिजवावे. आता दूध घालून घट्ट होइसपर्यंत शिजवावे. त्यामध्ये साखर, मेवे, वेलची पूड घालून दोन ते तीन मिनिट शिजवावे. तसेच गरमगरम सर्व्ह करावे.
 
sweet potato
3. रताळ्याचा शिरा 
साहित्य-
रताळे 2 मोठ्या आकाराचे 
दूध एक कप 
तूप 1/4 
वेलची पूड 1/4 
साखर 
मेवे 
 
कृती-
रताळे वाफवून घ्यावे. थंड झाल्यानंतर साल काढून मॅश करून घ्यावे. आता पॅनमध्ये तूप गरम करून त्यामध्ये मॅश केले रताळे घालावे. तसेच थोडयावेळाने दूध घालावे. व शिजू द्यावे. मग त्यामध्ये साखर घालून मेवे घालावे. व गरमागरम सर्व्ह करावा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik