बुधवार, 10 डिसेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

घरी कार्यक्रम आहे आणि काय बनवावे स्पेशल? सुचत नसल्यास ट्राय करा कोकोनट रबडी

Coconut rabdi recipe
वातावरण कुठलेही असो जर तुम्ही सारखे तेच गोड पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर नक्कीच ट्राय करा कोकोनट रबडी, कोकोनट रबडी चविष्ट लागते तेवढीच ती बनवायला देखील सोप्पी आहे. तर चला आज बनवू या स्पेशल कोकोनट रबडी रेसिपी 
 
साहित्य- 
1 लिटर क्रीम दूध 
अर्धा कप किसलेले नारळ 
अर्धा कप खवा 
साखर चवीनुसार 
काजू, वेलची, बदाम, पिस्ता 
केशर 
गुलाबाच्या पाकळ्या 
 
कृती-
कोकोनट रबडी बनवण्यासाठी सर्वात आधी एका पातेलीत पाणी गरम करावे. त्यामध्ये काजू भिजत टाकून 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवावे. मग पॅनमध्ये क्रिमी दूध घालून ते उकळवावे. दूध आटल्यानंतर त्यामध्ये केशर, खवा घालावा. नंतर भजवलेले काजू बारीक करून त्याची पेस्ट बनवावी. 
 
आता या मिश्रणामध्ये साखर आणि नारळाचा किस घालावा. मग नंतर काजूची पेस्ट घालावी. यानंतर वेलची घालून चांगल्याप्रकारे मिक्स करा. आता तयार झालेली रबडी थंड होऊ द्यावी. मग यावर गुलाबाच्या पाकळ्या आणि कापलेला मेवा टाकून सजवावे. तर चला तयार आहे आपली चविष्ट, गोड कोकोनट रबडी जी सर्वांनाच आवडेल. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik