शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: रविवार, 12 मे 2024 (09:09 IST)

घरीच बनवा थंडगार लौकीची रबडी, रेसिपी जाणून घ्या

अनेकांना गोड खाणं आवडत. दररोज त्यांना जेवणात काही गोड पदार्थ लागतात.उन्हाळ्यात काही थंड गोड पदार्थ खायला मिळाले तर जेवण छान होते. कडक उष्णतेवर मात करण्यासाठी घरीच लौकी म्हणजे दुधी भोपळ्याची रबडी बनवू शकता. चला तर मग रेसिपी जाणून घेऊ या. 
 
साहित्य
लौकी किंवा दुधी भोपळा  300 ग्रॅम
 दूध 1 लिटर
अर्धा कप मलई
 साखर 1 कप
बदाम 1 कप
 वेलची पावडर 1 टीस्पून
साजूक तूप 5चमचे
 
कृती- 
सर्वप्रथम सर्व साहित्य एकत्र करून लौकी धुवून घ्या त्याची साले काढा. लौकी किसून घ्या आणि बाजूला पसरवून ठेवा.जेणे करून त्यातील पाणी सुकेल.
गॅसवर पॅन ठेवा आणि त्यात तूप घालून वितळवून घ्या. त्यात किसलेली लौकी घाला चांगले परतून घ्या. नंतर त्यात दूध, मलई, साखर, वेलची पूड घालून ढवळून घ्या. नंतर त्याला शिजवून घ्या आणि दूध आटल्यावर बदाम टाकून गॅस बंद करा. 
रबडी तयार. रबडी थंड होण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवा आणि थंडगार रबडी वर नारळाचा किस घालून खाण्यासाठी सर्व्ह करा. 
 
Edited by - Priya Dixit