गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Updated : शनिवार, 25 मे 2024 (17:30 IST)

उन्हाळ्यात स्वादिष्ट आमरस पुरी खाण्याची मजाच वेगळी

सामग्री- 4 मध्यम आकाराचे आंबे, 1 लहान ग्लास दूध, वेलची पूड, केशर, साखर आवडीप्रमाणे (आंबा गोड असल्यास गरज नाही)
पुरीसाठी साहित्य- 1 कप कणिक, मीठ आणि तेल
 
कृती- आंबे धुऊन त्याचे लहान-लहान तुकडे करुन मिक्सरच्या जारमध्ये साखर आणि दुधासोबत ग्राइंड करुन घ्यावे. त्यात वेलचीपूड आणि केशर घालून मिसळावे. रस आवडीप्रमाणे घट्ट किंवा सैल ठेवू शकता.
कणिकमध्ये दोन मोठे चमचे तेल घालावे आणि मग चवीप्रमाणे मीठ घालून पाण्याने चांगले मळून घ्यावे. लहान-लहान गोळे तयार करुन घ्यावे. कढईत तेल गरम करावे आणि पुरी लाटून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावी. गरमागरम पुर्‍या आंब्याच्या रसासोबत सर्व्ह कराव्यात.