गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: बुधवार, 26 मे 2021 (21:35 IST)

फायदेकारक आरोग्यवर्धक चविष्ट खसखसची खीर

खसखशीचा वापर आरोग्यासाठी आणि चवी साठी केला जातो. हे औषधी स्वरूपात वापरतात.पौष्टिक खसखशीचा वापर भाजीची ग्रेव्ही किंवा शिरा बनविण्यासाठी केला जातो.तसेच खसखशीची खीर देखील बनविली जाते.चला तर मग जाणून घेऊ या साहित्य आणि कृती. 
 
साहित्य- 
1 लिटर दूध,100 ग्रॅम खसखस,100 ग्रॅम बदामाची तुकडी,1 चमचा साजूक तूप,4 लवंगा,2 तुकडे जायफळ,1 चमचा वेलचीपूड,100 ग्रॅम साखर,1/4 वाटी काजू-पिस्ता तुकडी. 
 
कृती-
सर्वप्रथम रात्री बदामाची तुकडी आणि खसखस वेग वेगळी भिजत घाला.सकाळी बदामाचे साल काढून खसखस सह वाटून घ्या.ही पेस्ट दुधात घोळून घ्या
एका कढईत तूप घालून जायफळ,लवंगाची फोडणी घालून दुधाचे घोळ घालून द्या.हे घोळ उकळवून घ्या.
मंद आचेवर अर्धा तास उकळा आणि ढवळत रहा. आता त्यात साखर घाला आणि15-20 मिनिटांनी काढून घ्या.बारीक चिरलेले काजू,पिस्ता,वेलची पूड,घाला.खसखशीची खीर खाण्यासाठी तयार. ही आरोग्यवर्धक आणि पौष्टीक आहे.