रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Updated : सोमवार, 2 सप्टेंबर 2024 (12:39 IST)

Boondi Laddu Recipe बुंदीचे लाडू

साहित्य- 
2 कप बेसन
½ चमचा पिवळा किंवा केशरी फूड कलर
तळण्यासाठी तूप
500 ग्रॅम साखर
500 ml पाणी
2-3 वेलची
चिमूटभर केशर
½ चमचा लिंबाचा रस
 
कृती-
बेसन, केशरी रंग यात पाणी घालून घट्ट भिजवून घ्या.
कढईत तूप गरम करा. 
झाऱ्यावर डावभर पीठ टाकून कढईवर धरुन ठेवा म्हणजे तुपात बुंदी पडतात. 
मंद आचेवर बुंदी कुरकुरीत तळा. 
बुंदी एका ताटात काढा. 
दरम्यान साखरेत पाणी घालून एक तारीचा पाक करा. 
त्यात वेलची, केशर, ड्राय फ्रट्स बुंदी घाला. 
थोडा वेळ मुरल्यावर लाडू वळा.