मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: शनिवार, 24 ऑगस्ट 2024 (07:00 IST)

जन्माष्टमी स्पेशल गुळाची खीर रेसिपी

Gud kheer
जन्माष्टमी हा दिवस भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस असून गोकुळाष्टमी म्हणूनही ओळखला जातो. तसेच या दिवशी श्रीकृष्णाला वेगवगेळे नैवेद्य अर्पण केले जातात. तसेच काही ठिकाणी छप्पन प्रसाद दिला जातो. याकरिता आपण जन्माष्टमी स्पेशल नैवेद्यायात गुळाची खीर पाहणार आहोत. तर चला जाणून घ्या रेसीपी 
 
साहित्य-
1 लिटर दूध
10 चिरलेले बदाम
10 चिरलेले काजू
1 चमचा वेलची पूड 
80 ग्रॅम तांदूळ 2 तास पाण्यात भिजवलेले 
3/4 कप किंवा 150 ग्रॅम गूळ
 
कृती-
सर्वात आधी 1 लिटर दूध उकळण्यासाठी ठेवावे. आता दुधात भिजवलेले तांदूळ घालावे. तांदूळ दुधात मऊ होईपर्यंत शिजवा. तसेच दूध पातेलीच्या तळाशी बसणार नाही म्हणून ढवळत राहावे. आता दुसऱ्या पातेलीत अर्धी वाटी पाणी टाका आणि त्यात गूळ टाका व गूळ वितळून घ्या. दुधात तांदूळ पूर्ण शिजल्यावर त्यात  बदाम, काजू आणि वेलची पूड घालून मिक्स करा.
 
आता गॅस बंद करावा. खीर थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवा. यामध्ये  गूळ घालून चांगले मिक्स करावे. गरम खीरमध्ये गूळ घालू नका, असे केल्याने दूध फाटू शकते. आता खीर भांड्यांमध्ये काढून घ्यावी. व यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik