रविवार, 10 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Updated : शनिवार, 17 ऑगस्ट 2024 (08:53 IST)

शिल्लक राहिलेल्या ब्रेडपासून बनवा लज्जतदार रसगुल्ले रेसिपी

bred rasgulle
नेहमी सकाळी नाश्त्यामध्ये सँडविच, टोस्ट बनवल्यानंतर ब्रेड हा शिल्लक राहतो. तसेच या राहिलेल्या ब्रेडला शक्यता कोणीही खाणे पसंत करत नाही. यामुळे अनेक घरांमध्ये ब्रेड हा टाकून देण्यात येतो. अश्या वेळेस ब्रेड टाकू नका तर त्यापासून आज आपण एक गोड रेसिपी जाणून घेऊ या. त्या रेसीपीचे नाव आहे ब्रेड रसगुल्ला रेसिपी.
 
साहित्य-
5 ब्रेड स्लाइस 
1 कप दूध 
1 कप साखर 
1 कप पाणी 
1/2 चमचे वेलची पूड 
1/4 कप कापलेले मेवे 
1 कप लिंबाचा रस 
 
कृती-
सर्वात आधी ब्रेडचे किनारे कापून टाकावे. आता छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये ब्रेड कापून घ्यावा. आता एका पॅनमध्ये दूध गरम करावे. व त्यामध्ये लिंबाचा रस घालावा. दूध फाटल्यानंतर गाळून घ्यावे. आता हा छेना थंड पाण्यात घालून नंतर ब्रेडच्या तुकड्यांसोबत मिक्स करा. व हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करावे. आता या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल्स बनवून साईडला ठेवा. आता एका पॅनमध्ये पाणी आणि साखर घालावी. यामध्ये वेलची पूड घालावी. साखरेचा पाक तयार झाल्यानंतर त्यामध्ये हे बॉल्स सोडावे. व 15 मिनिट साखरेच्या पाकात उकळून घ्यावे. तर चला तयार आहे आपले ब्रेड रसगुल्ले आता हे रसगुल्ले पाकातून काढून थंड करावे. मग यावर मेवे टाकून सर्व्ह करावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik