शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Updated : सोमवार, 29 जुलै 2024 (09:10 IST)

Sweet Dish : ब्रेड - पनीर रोट्स

साहित्य : ब्रेडच्या स्लाइसेस 16, अर्धी वाटी पनीर, दीड वाटी साखर, अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा कीस, बदाम, काजू 3-4, वेलची पूड, 1 लिंबू, चिमूटभर खाण्याचा पिवळा रंग.
 
कृती : पनीर चांगले मळून त्यात काजू, बदामाची जाडसर पूड, वेलची पूड व 1-2 चमचे पिठी साखर टाकून सर्व चांगले मिसळावे. ब्रेडच्या स्लाइसेसच्या कडा काढून त्या पाण्यातून काढून हाताने दाबवव्यात म्हणजे पाणी निघेल. नंतर त्यात पनीरचे थोडे सारण भरावे व अलगद हाताने गोल गुंडाळी करावी. अशा रीतीने सर्व रोट्‍स करावेत व ओल्या कापडाखाली झाकून ठेवावे.
 
नंतर साखरेचा एकतारी पाक करून त्यात लिंबाचा रस व पिवळा रंग टाकावा. पाक गरम असू द्यावा. तूप गरम करून त्यात ब्रेडचे तयार केलेले रोट्स हळूहळू तळावे व बदामी रंगावर तळल्यावर गरम पाकात टाकावे. पाकातून काढून ऐका ताटात खोबऱ्याचा कीस पसरवून त्यावर रोट्स घोळावेत व सर्व्ह करावे. हे रोट्स खोबऱ्यामुळे पांढरे व आकर्षक दिसतात.