रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 ऑगस्ट 2024 (14:41 IST)

Janmashtami 2024 : श्री कृष्णाला नैवेद्यासाठी ड्राय फ्रूट पंचामृत बनवा

Panchamrit
या जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवण्यासाठी  ड्राय फ्रूट पंचामृत बनवा. तसेच हे ड्राय फ्रूट  कसे बनवावे हे जाणून घ्या. जन्माष्टमी, भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस आहे. ज्याला श्रद्धा आणि भक्तीने भक्तीने साजरा करण्यात येतो. यादिवशी भगवान श्रीकृष्णांना अनेक प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात. त्यामध्ये पंचामृत एक पारंपरिक नैवेद्य आहे जो पूजामध्ये विशेष महत्वाचा आहे. तर चला आज आपण पाहणार आहोत ड्राय फ्रूट पंचामृत कसे बनवावे जाणून घ्या रेसिपी. 
 
साहित्य-
दूध 1 कप
दही 1 कप
मध 2 मोठे चमचे 
शुद्ध तूप- 1 मोठा चमचा 
साखर- 1 मोठा चमचा 
ड्राय फ्रूट्स-काजू, बादाम, किशमिश 1/4 कप बारीक कापलेले 
 
कृती-
एका पातेलीत दूध आणि दही घालून मिक्स करावे. आता यामध्ये मध आणि तूप घालावे. मध आणि तूप मिक्स केल्याने पंचामृतात गोडवा येतो. आता साखर घालून व्यवस्थित ढवळावे. साखर विरघळयानंतर त्यामध्ये ड्राय फ्रूट्स घालावे. ड्राय फ्रुट्स मुळे पंचामृताची चव तर वाढतेच पण पोषयुक्त देखील बनते. तर चला तयार आहे आपले पोषणयुक्त पंचामृत, ज्याचा तुम्ही श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik