रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जन्माष्टमी
Written By
Last Updated : बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (11:29 IST)

10 Remedies for Janmashtami जन्माष्टमीला या 10 पैकी एक उपाय आपल्याला करेल श्रीमंत

krishna
जन्माष्टमीला श्रीकृष्णाला प्रिय असलेले साहित्य अर्पित केल्याने कान्हाचे विशेष आशीर्वाद मिळतात.चला तर मग जाणून घेउया त्या 10 वस्तू काय आहेत- 
 
* राखी : कान्हा आणि बलराम यांना राखी बांधावी.
* तुळस : कान्हाच्या पूजेच्या वेळी तुळस आवर्जून वापरावी.
* शंख : जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाचे नंदलाल स्वरूपाचे शंखात दूध घालून अभिषेक करावं.
* फळ आणि धान्य : कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी धार्मिक स्थळी जाऊन फळ आणि धान्य देणगी म्हणून द्यावं.
* गाय आणि वासरू : या दिवशी गाय आणि वासराची लहान मूर्ती आणल्याने देखील पैश्याची आणि मुलांची काळजी दूर होते.
* मोरपीस : मोरपीस श्रीकृष्णाला खूप प्रिय आहे. म्हणून जन्माष्टमीच्या पूजेत मोरपीस ठेवावं.
* पारिजात : श्रीकृष्णाला पारिजात,हारसिंगार,शेफालीची फुले आवडतात.आपल्या पूजेत हे उपयोगात घ्या.
* चांदीची बासरी : या दिवशी चांदीची बासरी आणून कान्हाला अर्पण करावी. नंतर पूजा पूर्ण झाल्यावर आपल्या पर्समध्ये सुरक्षित ठेवावी.
* लोणी-खडीसाखर : जन्माष्टमीच्या दिवशी लोणी आणि खडीसाखरचे नैवेद्य दाखवून 1 वर्षाहून लहान वयाच्या मुलांना आपल्या बोटाने चाटवावे.
* झोपाळा : या दिवशी सुंदर झोपाळा सजवून त्यामध्ये कान्हाला बसवावं.