सोमवार, 3 नोव्हेंबर 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 1 नोव्हेंबर 2025 (17:43 IST)

तुळशीजवळ ही ५ झाडे लावणे अशुभ !

तुळशीजवळ ही ५ झाडे लावणे अशुभ
तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप ! तिच्या पवित्रतेमुळे घरात सुख-शांती येते, नकारात्मक ऊर्जा दूर होते. पण वास्तुशास्त्रात तुळशीजवळ काही झाडे लावणे महाविषम मानले जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते, आर्थिक नुकसान, विवाद किंवा आरोग्य समस्या येऊ शकतात म्हणून ही झाडे कधीच लावू नका!  खालील ५ झाडे तुळशीपासून कमीत कमी ४-५ फूट दूर ठेवा किंवा टाळा:
 
काटेरी झाडे - काटे नकारात्मक ऊर्जा पसरवतात, तुळशीच्या सकारात्मकतेला हानी. घरात तणाव, वैर वाढते.
कडू फळे देणारी - कडवट स्वभाव तुळशीच्या शुभतेला विरोध करतो. आर्थिक अडचणी, कुटुंब कलह.
दुधाळ झाडे -दुधाळ रस विषारी असतो, पवित्रतेला प्रदूषित करतो. आरोग्य हानी, नशीब खराब.
निवडुंग-तीक्ष्ण काटे संपूर्ण घरात नकारात्मकता आणतात. जीवनात अडथळे, दुर्दैव.
वाळलेली किंवा बोन्साय झाडे- मृत/अपूर्ण वाढ नकारात्मकता वाढवते. प्रगतीत अडगा, दारिद्र्य.
तुळस नेहमी कुंडीत लावा (जमिनीत नाही), उत्तर-पूर्व दिशेला ठेवा.
दररोज दिवा लावा, पूजा करा विशेष करुन गुरुवार आणि शुक्रवार.
चप्पल, कचरा, झाडू, शिवलिंग तुळशीजवळ ठेवू नका.
तुळशीजवळ तुळसी, बेल, अमला लावा, सुख वाढेल
 
तुळस पूजा पद्धत
हात-पाय धुवा, स्वच्छ कपडे घाला. तुळशी कुंडी स्वच्छ करा.
तुळशीला पाणी शिंपडा (दुध मिसळलेले ऐच्छिक).
तुळशीला फुले अर्पण करा.
अगरबत्ती आणि दिवा लावा, तीन वेळा प्रदक्षिणा घाला.
खडीसाखर/फळ ठेवा, प्रार्थना करा.
तुळस आरती आणि कापूर आरती करा, हात जोडून नमस्कार करा.
 
कधीच करू नका (निषिद्ध):
संध्याकाळी सूर्यास्तानंतर पाणी देऊ नका. 
मासिक धर्मात, अपवित्र अवस्थेत तुळशीला हात लावू नका. संध्याकाळी किंवा रविवारी 
फुले तोडू नका. 
तुळस जमिनीत लावू नका.
 
हे वास्तु नियम शास्त्रांवर आधारित आहेत. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. अधिक आणि अचूक माहितीसाठी वास्तु तज्ज्ञ यांच्याशी सल्ला घ्या.