गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : रविवार, 16 मार्च 2025 (08:49 IST)

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

Tulsi And Shivling
Tulsi And Shivling आपण एखाद्या झाडाजवळ छोटे दगडी शिवलिंग पाहतो. अनेक वेळा तुळशीच्या रोपाजवळ देखील हे ठेवलेल्याचे दिसते. एखाद्या मंदिरात तुळशीचे रोप लावले तर काही लोक तेथे छोटे शिवलिंग ठेवतात. तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग ठेवणे योग्य आहे की नाही?
 
शिवलिंग : शिवलिंग चुकूनही तुळशीजवळ ठेवले जात नाही. तुलसी पूर्वी वृंदाच्या रूपात जालंधरची पत्नी होती, जिला भगवान शिवाने मारले होते. वृंदा दुःखी झाली आणि पुढे तुळशीच्या रोपात तिचे रुपांतर झाले. त्यामुळे त्यांनी भगवान शिवाला त्यांच्या अलौकिक आणि दैवी गुणांपासून वंचित ठेवले. दुसरे म्हणजे भगवान विष्णूने तुळशीला पत्नी म्हणून स्वीकारले आहे, त्यामुळे तुळशीजवळ शिवलिंग ठेवू नये आणि शिवलिंगावर तुळशीची पाने अर्पण करू नयेत.
 
गणेशमूर्ती: पौराणिक कथेनुसार, जेव्हा देवी तुळशीने गणपतीला पाहिले तेव्हा तिने त्याला तिच्याशी लग्न करण्याची विनंती केली. गणेशजींनी त्यास नकार दिला. संतप्त होऊन तुळशीने गणेशजींना शाप दिला की, त्यांची दोन लग्ने होतील. यामुळेच तुळशीच्या रोपाजवळ गणेशाची मूर्ती ठेवली जात नाही.
 
शाळीग्राम ठेवणे योग्य : तुळशीच्या रोपाजवळ श्री हरीचे आराध्य दैवत शालिग्राम ठेवता येते. याशिवाय लक्ष्मीची मूर्तीही ठेवता येते. श्रीहरीशी संबंधित वस्तू ठेवू शकता.