भगवान श्रीकृष्णाशी संबंधित 36 मनोरंजक गोष्टी, नक्की जाणून घ्या

krishna
अनिरुद्ध जोशी| Last Modified मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (14:44 IST)
शरीर वैशिष्ट्ये :
1. भगवान श्री कृष्णाच्या त्वचेचा रंग मेघश्यामल होता, काळा किंवा सावळा नव्हे.

2. भगवान श्री कृष्णाच्या शरीरातून एक मादक गंध निघत असे. ज्याला युद्ध काळात लपवण्यासाठी ते सतत प्रयत्न करत होते.

3. भगवान श्री कृष्णाच्या परमधामगमन वेळी ना त्यांचे केस पांढरे होते ना त्यांच्या शरीरावर सुरकुत्या होत्या.

4. भगवान श्री कृष्णाचे स्नायू मृदु परंतू युद्धाच्या वेळी ताणलेल्या असायचे, म्हणून त्यांच लावण्यमय शरीर युद्धाच्या वेळी अत्यंत कठोर

दिसू लागायचं. असेच लक्षणं कर्ण व द्रौपदी यांच्या शरीरात देखील बघायला मिळत होते.

5. भगवान श्रीकृष्णाचे केस कुरळे होते आणि त्यांचे डोळे मोहक.

6. शरीरावर पिवळे वस्त्र आणि डोक्यावर मोर मुकुट धारण केलेले, गळ्यात बैजयंती माळ आणि हातात बासरी घेतलेलं त्यांचा रुप

आकर्षित करायचं.

श्रीकृष्‍णाचे नातेवाईक :

7. भगवान कृष्णाची पणजी 'मारीषा' आणि सावत्र आई रोहिणी (बलरामची आई) 'नाग' जमातीशी संबंधित होत्या.
8. भगवान श्री कृष्णासोबत तुरुंगात बदललेल्या यशोदपुत्रीचे नाव एकानंशा असे होते, ज्याची आज विंध्यवासिनी देवीच्या नावाने पूजा

केली जाते.

9. भगवान श्रीकृष्णाची प्रेयसी राधा सह राधाच्या अष्ट मैत्रिणी देखील होत्या. अष्टसखींचे नावे- 1. ललिता, 2. विशाखा, 3. चित्रा, 4.

इंदुलेखा, 5. चंपकलता, 6. रंगदेवी, 7. तुंगविद्या 8. सुदेवी.

10. श्रीकृष्णाच्या 8 बायका होत्या- रुक्मणि, जाम्बवन्ती, सत्यभामा, कालिन्दी, मित्रबिन्दा, सत्या, भद्रा आणि लक्ष्मणा.
11. भगवान श्रीकृष्णाचे अनेक बाल सखा होते. जसे मधुमंगल, सुबाहु, सुबल, भद्र, सुभद्र, मणिभद्र, भोज, तोककृष्ण, वरूथप, श्रीदामा,

सुदामा, मधुकंड, विशाल, रसाल, मकरन्‍द, सदानन्द, चन्द्रहास, बकुल, शारद आणि बुद्धिप्रकाश इतर. उद्धव आणि अर्जुन नंतर सखा झाले.

बलराम त्यांचे मोठे भाऊ होते आणि मित्रही.

12. ब्रह्मवैवर्त पुराणानुसरा सखींचे नावे अशी आहेत- चन्द्रावली, श्यामा, शैव्या, पद्या, राधा, ललिता, विशाखा व भद्रा. काही जागी हे

नावे असे आहेत- चित्रा, सुदेवी, ललिता, विशाखा, चम्पकलता, तुंगविद्या, इन्दुलेखा, रंगदेवी आणि सुदेवी. काही जागी ललिता, विशाखा,

चम्पकलता, चित्रादेवी, तुंगविद्या, इन्दुलेखा, रंगदेवी आणि कृत्रिमा (मनेली). यापैकी काही नावांमध्ये अंतर आहे.

13. कृष्णाच्या 3 बहिणी होत्या- एकानंगा (यशोदा पुत्री), सुभद्रा आणि द्रौपदी (मानस भगिनी). कृष्णाच्या भावांमध्ये नेमिनाथ, बलराम

आणि गद होते.

14. श्रीकृष्‍णाचे आई- वडील वसुदेव आणि देवकी होते, परंतु त्यांच संगोपन नंदबाबा आणि यशोदा यांनी केलं. श्रीकृष्‍णाने यांसह आपल्य

सावत्र आई रोहिणी व इतरांशी देखील नाते ठेवले.

15. श्रीकृष्‍णाची आत्या कुंती आणि सुतासुभा होत्या. कुंतीचे पुत्र पांडव होते आणि सुतासुभाचा पुत्र शिशुपाल होता.

16. बहिण सुभद्राचा विवाह कृष्णाने आपल्य आत्या कुंती पुत्र अर्जुनसोबत केले होते. याच प्रकारे श्रीकृष्णाने आपल्या पुत्र साम्बाचा विवाह

दुर्योधन पुत्री लक्ष्मणासोबत केले होते.

17. श्रीकृष्णाने आपल्या भाच्या अभिमन्यूला शिकवले होते आणि त्यानेच आपल्या मुलाचे गर्भात संरक्षण केले.

18. भगवान श्रीकृष्णाचे गुरु सांदीपनी होते. त्यांच आश्रम अवंतिका (उज्जैन) येथे होतं. या व्यतिरिक्त त्यांचे गुरु गर्ग ऋषी, घोर अंगिरस,

नेमिनाथ, वेदव्यास इतर होते. असेही म्हटले जाते की जैन परंपरेनुसार भगवान श्रीकृष्णाचे चुलतभाऊ तीर्थंकर नेमिनाथ होते जे हिंदू

परंपरेत घोर अंगिरस म्हणून प्रसिद्ध आहेत.

19. द्रौपदी आणि श्रीकृष्णाचं नातं वेगळचं होतं. श्रीकृष्‍ण दौप्रदीला आपली बहिण म्हणून खूप सन्मान देत असे. दोघांचे नाते घट्ट होते.


युद्ध कला :
20. भगवान श्री कृष्णाने आपलं औपचारिक शिक्षण उज्जैनच्या संदीपनी आश्रमात मात्र काही महिन्यात पूर्ण केलं. येथे त्यांनी 16 विद्या

आणि 64 कला शिकल्या होत्या.
21. एक सामान्य समज आहे की अर्जुन सर्वोत्तम धनुर्धर होता, परंतु प्रत्यक्षात कृष्ण हा या विषयातही सर्वोत्तम होता. आणि असे सिद्ध

झाले की मद्र राजकुमारी लक्ष्मणाच्या स्वयंवरमध्ये ज्याची स्पर्धा द्रौपदी स्वयंवर सारखीच पण अधिक कठीण होती. येथे कर्ण व अर्जुन

दोघेही अपयशी ठरले तेव्हा कॄष्णाने लक्ष्यवेध करुन लक्ष्मणाची इच्छा पूर्ण केली होती, ज्या आधीपासून त्यांना आपलं पती मानत होती.
22. भगवान श्री कृष्णाच्या खड्गचे नाव नंदक, गदाचे नाव कौमौदकी आणि शंखाचे नाव पांचजन्य होतं जे गुलाबी रंगाचं होतं.

23. भगवान् श्री कृष्णाच्या धनुष्यचे नाव शारंग आणि मुख्य आयुध चक्राचे नाव सुदर्शन होतं. ते लौकिक, दिव्यास्त्र व देवास्त्र तिन्ही

रुपात कार्य करु शकत होतं आणि त्याच्या बरोबरीसाठी विध्वंसक केवळ दो अस्त्र अजून होते पाशुपतास्त्र (शिव, कॄष्ण आणि अर्जुन

यांच्याजवळ) आणि प्रस्वपास्त्र (शिव, वसुगण, भीष्म आणि कृष्ण यांच्याजवळ).

24. लोकप्रिय दंतकथांनुसार, भगवान श्री कृष्णाने ब्रज प्रदेशातील जंगलांमध्ये युद्धकला विकसित केली. त्यांनी दांडिया रास देखील सुरू

केला.

25. कलारीपट्टुचे प्रथम आचार्य कृष्णाला मानलं जातं. या कारणास्तव, नारायणी सैन्य भारतातील सर्वात भयंकर हल्ला करणारी सेना

बनली होती. भगवान् श्री कृष्णाने कलारीपट्टु याचा पाया ठेवला जे नंतर बोधिधर्मन होत आधुनिक मार्शल आर्टमध्ये विकसित झालं.

26. भगवान श्रीकृष्णाच्या रथाचे नाव जैत्र होते आणि त्यांच्या सारथीचे नाव दारुक/ बाहुक होते. त्यांच्या अश्वांचे नाव शैव्य, सुग्रीव,

मेघपुष्प आणि बलाहक होते.

27. भगवान् श्रीकृष्णाने अनेक अभियान आणि युद्धांचे संचालन केले होते, परंतु यापैकी तीन सर्वाधिक भयंकर होते. 1- महाभारत, 2-

जरासंध आणि कालयवन विरुद्ध आणि 3- नरकासुराविरुद्ध

29. भगवान् श्रीकृष्णाने केवळ 16 वर्षाच्या वयात जगप्रसिद्ध चाणूर आणि मुष्टिक सारख्या मल्लांचे वध केले होते. मथुरेत दुष्ट रजकचे

शिश हाताच्या प्रहाराने कापले होते.

30. भगवान् श्री कृष्णाने आसाममधील बाणासूरच्या लढाई दरम्यान, भगवान शिव यांच्याशी झालेल्या लढाई दरम्यान, माहेश्वर ज्वराच्या

विरुद्ध वैष्णव ज्वरचा वापर करून जगातील पहिले जीवाणू युद्ध लढले होते.

31. भगवान् श्री कृष्णाच्या जीवनातील सर्वात भयानक द्वंद्व युद्ध सुभुद्रेच्या प्रतिज्ञेमुळे अर्जुनसह झालं होतं, ज्यात दोघांनी आपआपले

सर्वात विनाशक शस्त्र क्रमशः सुदर्शन चक्र आणि पाशुपतास्त्र काढले होते. नंतर देवांच्या हस्तक्षेपाने दोघांना शांत करण्यात आले.

इतर तथ्‍य :
32. भगवान् श्री कृष्णाच्या शेवटल्या वर्षांना सोडून ते कधीही द्वारिकामध्ये 6 महिन्यापेक्षा अधिक काळा राहिले नाही.

33. भगवान् श्री कृष्णाने 2 नगर स्थापित केले होते द्वारिका (पूर्वमध्ये कुशावती) आणि पांडव पुत्रांसह इंद्रप्रस्थ (पूर्वमध्ये खांडवप्रस्थ).

34. भगवान् श्री कृष्णाने श्रीमद्भगवतगीता या रुपात अध्यात्माचे वैज्ञानिक स्पष्टीकरण दिले, जी मानवतेसाठी आशेचा सर्वात मोठा संदेश

होतं, आहे आणि नेहमीच राहील.

35. भगवान श्री कृष्णाने श्रीमद्भगवतगीता या व्यतिरिक्त अनुगीता, उद्धव गीता या रुपात देखील गीता ज्ञान दिले होते.

36. पौराणिक मान्यतेनुसार, भगवंताने त्रेतामध्ये राम म्हणून अवतार घेतला आणि बालीला लपून बाण मारला होता. कृष्णावतारात

भगवानने त्या बालीला जरा नामक बहेलिया केलं आणि स्वत:साठी तशाच मृत्यू निवडला ज्याप्रकारे बालीला दिला होता.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची| नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची| सर्वांगी सुंदर उटी ...

Raksha Bandhan Jokes रक्षाबंधन जोक्स

Raksha Bandhan Jokes रक्षाबंधन जोक्स
बायको - आज संध्याकाळी येताना जरा राख्या घेत या. नवरा - तुझ्या भावासाठी मी का आणू? बायको ...

Vastu for Ganesha idols अशी गणपतीची मूर्ती घरात मुळीच ठेवू ...

Vastu for Ganesha idols अशी गणपतीची मूर्ती घरात मुळीच ठेवू नका, अन्यथा तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो
वास्तुशास्त्रानुसार अशी गणपतीची मूर्ती आणू नये की ज्यामध्ये त्यांची सोंड उजव्या बाजूला ...

Who is Bhadra कोण आहे भद्रा, काय आहे भद्राची कथा

Who is Bhadra कोण आहे भद्रा, काय आहे भद्राची कथा
पुराणात भद्राबद्दल एक कथा आहे. या मते भद्रा ही सूर्यदेवाची कन्या आणि शनीची बहीण आहे. असे ...

Krishna Janmashtami : कोण आहे योग, कर्म आणि ...

Krishna Janmashtami : कोण आहे योग, कर्म आणि भक्तीचाअधिष्ठाता, ज्याने जीवनाचे रहस्य उघडले?
श्री कृष्णाविषयी हे सर्वज्ञात आहे की ते एकमेव देवता आहेत ज्यांनी जीवनाचे रहस्य थेट ...

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...