1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जन्माष्टमी
Written By
Last Updated : शुक्रवार, 23 ऑगस्ट 2024 (18:36 IST)

Srikrishna Heart येथे आजही धडधडत आहे श्रीकृष्णाचे हृदय...

Lord Krishna
हिंदू धर्माच्या पवित्र स्थळ आणि चार धाम यांच्यातून एक जगन्नाथ पुरी या स्थळाला भगवान विष्णूंचे स्थळ मानले गेले आहे. जगन्नाथ मंदिराशी एक गूढ जुळलेले आहे. स्थानीय मान्यतेनुसार येथील मूर्तीच्या आत श्रीकृष्णाच्या हृदयाचे पिंड ठेवलेले आहे ज्यात ब्रह्मा विराजमान आहेत.
 
लोकांच्या मते जेव्हा श्रीकृष्णाचा मृत्यू झाला तेव्हा पांडवांनी त्यांच्या शरीराचे दाह-संस्कार केले परंतू हृदय (पिंड) जळत राहिले. ईश्वरीय आदेशानुसार पांडवांद्वारे हे पिंड पाण्यात प्रवाहित केले गेले. पिंडाने लाकडाचा ओंडका अश्या प्रकाराचे रूप धारण केले नंतर राजा इन्द्रद्युम्न (प्रभू जगन्नाथांचे भक्त) यांनी त्याला जगन्नाथांच्या मूर्तीत स्थापित केले. त्या दिवसापासून आजपर्यंत ओंडका मूर्तीच्या आत विराजमान आहे. प्रत्येक 12 वर्षात मूर्ती परिवर्तित करण्यात येते परंतू लठ त्यात ठेवण्यात येतं.