शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2025 (06:27 IST)

श्री दत्त नामाची उत्पत्ती, महत्त्व आणि जप

श्री दत्त नामाची उत्पत्ती
दत्त नामाची उत्पत्ती कशी झाली? या नावाचे महत्तव काय? जप कशा प्रकारे करावा आणि त्याचे फायदे काय?
दत्त नामाची उत्पत्ती कशी झाली?
'दत्त' हा शब्द संस्कृतमधील 'दा' (देणे) या पासून बनला आहे, ज्याचा अर्थ "दिलेले", "दानरूप" किंवा "स्वतःला सर्वांना अर्पण केलेले" असा आहे.
 
पौराणिक कथेनुसार दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे एकत्रित स्वरूप मानले जातात. ते अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनसूया यांचे पुत्र आहेत. जेव्हा ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश यांनी अनसूयेच्या पातिव्रत्याची परीक्षा घेण्यासाठी बालकांचे रूप घेतले आणि अनसूयेच्या विनंतीनुसार तिच्याकडे पुत्र म्हणून राहिले, तेव्हा अत्री ऋषींनी त्या बालकांना 'देवाने दिलेले' (देवेन दत्तं) म्हणून 'दत्त' असे नाव दिले. या त्रिमूर्तींच्या अंशातून चंद्र (ब्रह्मदेवाचा अंश), दत्त (विष्णूचा अंश) आणि दुर्वास (शंकराचा अंश) यांचा जन्म झाला. दत्तात्रेय हे आत्मज्ञान, वैराग्य, शिवशक्ती योग आणि दास्यभक्ती यांचा संगम मानले जातात.
 
दत्त नावाचे महत्त्व काय?
त्रिमूर्ती स्वरूप: दत्त म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे एकरूप. त्यामुळे त्यांच्या उपासनेने एकाच वेळी तिन्ही देवांची उपासना होते.
परमगुरु: दत्तात्रेयांना 'गुरुदेव' मानले जाते. ते परमगुरु आहेत आणि त्यांची उपासना गुरुस्वरूपातच केली जाते.
निर्गुणाची अनुभूती: 'दत्त' म्हणजे ज्याला 'आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत' अशी निर्गुणाची अनुभूती दिलेली आहे असा.
पितृदोषापासून मुक्ती: श्री दत्त हे पूर्वजांना पुढील गती देणारी देवता आहे. नामजपामुळे मृत्युलोकात अडकलेल्या पूर्वजांना गती मिळते आणि त्यामुळे व्यक्तीला होणारा पितृदोषाचा त्रास कमी होतो.
दत्त म्हणजे देणं- स्वत:चा अहं, मोह, अज्ञान यांचा त्याग करुन शुद्ध चैतन्याला स्वत:च्या रुपात स्वीकारण करणं.
 
जप कशा प्रकारे करावा आणि त्याचे फायदे काय?
दत्तगुरूंच्या जपासाठी सर्वात जास्त वापरला जाणारा आणि प्रभावी मंत्र म्हणजे ॥ श्री गुरुदेव दत्त ॥ याव्यतिरिक्त ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ हा मंत्रही खूप प्रचलित आहे.
 
जप करण्याची पद्धत: 'श्री गुरुदेव दत्त' हा नामजप करताना 'गुरुदेव' या शब्दावर संपूर्ण शरणागतीचा भाव ठेवावा. 'गुरुदेव' या शब्दानंतर थोडा वेळ थांबून 'दत्त' हा शब्द म्हणावा आणि 'द' वर जोर द्यावा. शक्य असल्यास नित्य नियमाने दररोज, विशेषतः गुरुवारी (दत्तगुरूंचा दिवस) किंवा दत्तजयंती या काळात अधिक जप करावा. तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी वापरली जाते.
फायदे: 
पितृदोषातून मुक्ती मिळते. दत्त नामाच्या जपाने पूर्वजांना गती मिळते, ज्यामुळे पितृदोष दूर होतो आणि प्रगतीतील अडथळे दूर होतात.
संरक्षण आणि शक्तीनकारात्मक शक्तींपासून (अनिष्ट शक्ती) संरक्षण मिळते. 'दत्त बावन्नी' या स्तोत्राचे पठण केल्याने सर्व संकटांवर मात करता येते अशी समजूत आहे.
आत्मिक शांती मिळते, मन शांत होते, तणाव आणि चिंता कमी होते. अंतःकरणात शांती, ज्ञान आणि वैराग्य या तत्त्वांचा प्रकाश फुलतो.
नामजपामुळे साधकाचे संचित व प्रारब्ध कर्मे मंद होतात आणि अहंकार व मायाभ्रम वितळून जातो.
नाम जपामुळे एकाग्रता सुधारते आणि आत्मज्ञानाच्या दिशेने प्रगती होते.
दत्त गुरूंच्या मंत्र जपाने वास्तु दोष दूर होण्यास मदत होते.