प्रवास: माय-लेकीचा...

Last Modified शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020 (12:15 IST)
लहानपणी मराठी परिक्षेत नेहमी निबंध असे 'माझी आई'. तेव्हा वाक्य ठरलेली असत. "माझी आई खूप सुंदर आहे, माझी आई छान गाणं म्हणते, माझी आई स्वयंपाक खूप छान करते, माझी आई मला खूप आवडते", झाला निबंध. भाषा बदलली तरी वाक्य तीच फक्त अनुवादित. ह्या पलिकडे लिहायचं तर आई समजलेलीच कुठे असते आपल्याला त्या वयात. बस आई आई असते. गरज असते (जी अनंत काळाची असते), श्वास असते म्हणा ना.
'आई' म्हणजे काय हे समजेपर्यंत निबंध लिहिण्याचं वय निघून गेलेलं असतं किंवा आई ह्या विषयावर निबंध लिहिणं बालिशपणाचं वाटतं कारण तोपर्यंत आपल्यावर बाहेरच्या जगाचा प्रभाव असतो आणि आपले idols बदललेले असतात. अपरिपक्व विचारांमुळे हे idols पण बदलत असतात, प्रगल्भतेने त्याना स्थैर्य येतं. आईला मात्र backseat दिलं जातं आणि ते ती अगदी सहज स्वीकारते.

आईच्या पदरापासून सुरु झालेला माझा आणि आईचा हा प्रवास..... माझ्या जन्माच्या वेळी खूप दिव्यातून आईला जावे लागले, माझा जन्म झाला आणि आईचा पुनर्जन्म. पुढे पूर्ण वर्ष माझी खूप काळजी घ्यावी लागणार होती जी तिने लिलया पार पाडली, कशी ते मात्र मला मी आई झाल्यावर कळले.

"तू कुणाची" असा प्रश्न विचारताच माझं चटदिषी उत्तर येई , 'मी बाबांची'. नकळत आईच्या मनावर एक ओरखडा. पण हसतमुखाने लटक्या रागात तिची एखादी चापट, एवढीच प्रतिक्रीया. आज कळतं की नकळत किती आघात करत असतो आपण आईच्या मनावर.

तेव्हां आई ही माझी प्रतिस्पर्धी, स्त्री म्हणून बाबांच्या प्रेमाची वाटेकरी, बाल बुद्धीला एवढंच कळत असे. आमच्यात fine tuning होऊ लागलं आणि मी आईची कधी झाले कळलंच नाही.

लहानपणी प्रत्येकाला वाटत असतं की आपली आई एक परी आहे आणि तिच्याकडे जादुची छडी आहे. मला पण असंच वाटे, खासकरुंन दिवाळीत कारण रात्री झोपताना सामसुम दिसणार्या स्वयंपाकघरात सकाळी उठले की स्वादिष्ट फराळाचा घमघमाट असे, तेव्हां कळायचंच नाही ही झोपते कधी, ऊठते कधी आणि सगळं करते कधी. फक्त खायचं तेवढं कळत असे. दिवाळीची आणखी एक आठवण म्हणजे तिची वसुबार्सेची रांगोळी. पाटावर अत्यंत सराईतपणे ती गाय आणि वासरू काढत असे ते ही रांगोळीने. मी दिवसभर त्या रांगोळीची वाट बघत बसे. आज त्याच थरथरत्या हातांना रांगोळीची दोन बोटं ओढणं किती जड जातं हे बघून गलबलून येतं.

पण "मी बाबांची" म्हणणारी मी, वाढले मात्र आईच्या शिस्तीत. नुसतं बाबांच्या रागे भरण्याने ताप काढणारी (आणि नंतर त्यांच्याशी कट्टी घेणारी) मी आणि हवालदील बाबा, हे चित्र बघताच त्या माऊलीला लगेच समजले, इकडे शिस्त लावण्याचे काम तिलाच करावे लागणार आणि ते पण मोठ्या खुबिने!
मग काय सुरु झाला आमचा क्लास.

तिच्या ह्या क्लास मधे 'To Do ' ची लिस्ट कमी, 'Not to Do' ची लिस्टच मोठी होती. असं वागायचं नाही, असं बोलायचं नाही. मी कधी रागाने तिला म्हणे, "काय गं सारखी नकार देत असतेस? "तर शांतपणे मला समजावी," कारण तुला नकार पचवता आला पाहिजे आणि नकार देता पण आला पाहिजे". त्या वयात तिचं बोलणं किती कळलं कुणास ठाऊक, पण पुढच्या आयुष्यात नक्कीच उपयोग झाला.

शालेय जीवनातून कॉलेज मध्ये पाऊल ठेवले आणि तिच्या नजरेला आणिकच धार आली. बुरसटलेल्या विचारांची नाही ती, पण मैत्री कुणाशी असावी आणि कशी असावी ह्याचे मात्र नियम होते.

तिच्यात आता एक मुलीची आई जरा जास्तच डोकावू लागली. आता शिस्तिची जागा माझ्या बद्दल वाटणार्या काळजीने घेतली आणि त्या काळजीपोटी माझ्यावर वेळेत घरी येण्याचं बंधन घातलं गेलं. कधी चुकून उशीर झाला तर तिचा काळजीने चेहरा काळवंडलेला असे, मग मलाच अपराधी वाटे. इतक्या वर्षांनी आज ही तिच अवस्था असते तिची.
तिच्याकडून शिकले तडजोड कधी, कुठे आणि किती करायची, तेही आत्मसन्मान सांभाळून. तिच्या प्रत्येक कृतीत माझ्यासाठी शिकवण असे. कणिक भिजवताना परात स्वच्छ दिसली पाहिजे, उश्टी खरकटी भांडी इतकी स्वच्छ पहिजेत की कामवालीला आज स्वयंपाक काय होता ते कळता कामा नये. करंजी करताना एक मोदक आणि मोदक करताना
एक करंजी करायचीच असते, का विचारलं की म्हणे बहिणीला भाऊ आणि भावला बहिण ही पहिजेच. ह्या आणि अशा अनेक गोष्टी शिकले ज्या मला पुढे कामी आल्या.
बाकी बर्याच गोष्टी तर तिला बघून बघूनच शिकले. असेच तर घडत असतात संस्कार.

तर ही माझी आई, माझं लग्न ठरल्यावर मात्र थोडी चिडचिडी झाली. कदाचित धास्तावली. कदाचित मला पुढे जड जाऊ नये म्हणून मुद्दाम मायेचे पाश सैल करु बघत होती. कदाचित स्वतःलाच जड जाऊ नये म्हणून?

सासरी मी पटकन रुळावी म्हणून? असेल कदचित !!


मुलगी म्हणून अती स्तुती कधीच केली नाही. एखादा पदार्थ मी केला की छान झालाय असं म्हणायची की मी समजून जायचे अजुन सुधारणा करण्यास वाव आहे. "तुला माझं कौतुकच नाही" हे माझं पेटंट वाक्यं आणि "मुळूमुळू रडायचं नाही, येत नाही म्हणायचं नाही, करुन बघ, शिकून घे" ही तिची पेटंट वाक्यं. पुढे मला मुलं झाल्यावर ह्या वाक्यांत आणिक भर पडली. "सारखं ओरडू नाही गं मुलांना! किती बोलतेस ! अशाने कोडगी होतील ती! "बघा, हाय का आता? आईची आजी झाल्यावर नियम आणि शिस्त दोन्ही शिथिल होतात, किंबहूना पूर्णच बदलतात. नातवंडांना सगळं माफ! तर अशी मी तिच्या तालमित घडत गेले, नुसतीच घडले नाही तर सक्षम झाले मानसिक दृष्ट्या.
आज लिहिता लिहिता तिची अनेक रुपं माझ्या डोळ्यासमोर सर सर सरकली. रात्री जागून माझ्यासाठी परकरपोलकं शिवणारी तेही हाताने, माझा नाच बसवणारी, माझ्या जड आणि टोचणार्या घूंगरांसाठी जाड पट्टी करुन देणारी, माझ्या प्रत्येक डांस प्रोग्राम मागे मेहनत घेणारी, मला सगळं आलच पाहिजे असा अट्टाहास करणारी, आपली मुलगी आयुष्याच्या कुठल्याही शर्यतीत मागे पडू नये म्हणून धडपडणारी.
मला आराम मिळावा म्हणून माझ्या तान्हुल्यांना सांभाळणारी, आणखी किती रुपात दिसली ती मला काय आणि किती लिहू?

खरं तर लिहुच काय? 'आई' हाच एक अखंड ग्रंथ असतो, ज्याची कितिही वाचलं तरी पानं संपतच नाहीत, असं वाटतं अजुन कितीतरी वाचयचे बाकी आहे. अशी ही माझी आई !

हा प्रवास फक्त माझा आणि आईचा नसून सगळ्या माय-लेकींचा प्रवास आहे. काळानुरूप त्यात मैत्रीची भर पडली आणि तो आणिकच सुंदर, सुखकर आणि समृद्ध झाला. आपला हा प्रवास असाच चालू राहोत....

- सोशल मीडिया


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

असं का होतं कुकर मध्ये अन्न लवकर का शिजत?

असं का होतं कुकर मध्ये अन्न लवकर का शिजत?
कुकर मध्ये अन्न लवकर का शिजत?

अकबर बिरबल कथा- अखेर बिरबलाने चोर पकडला

अकबर बिरबल कथा-   अखेर बिरबलाने चोर पकडला
एकदा एक व्यापारी व्यवसायाच्या कामाने काही दिवसांसाठी राज्यातून बाहेर गेला होता. काम ...

मुलांसाठी बनवा चविष्ट ब्रेड उत्तपा

मुलांसाठी बनवा चविष्ट ब्रेड उत्तपा
दररोज एकच नाश्ता खाऊन कंटाळा आला आहे आणि घरात ब्रेड आणि रवा सगळेच आहे मग आपण ह्याचा वापर ...

प्लॅस्टिकच्या भांड्यावरील डाग काढण्यासाठी हे सोपे उपाय ...

प्लॅस्टिकच्या भांड्यावरील डाग काढण्यासाठी हे सोपे उपाय अवलंबवा
आजकाल प्लॅस्टिकच्या भांडी बऱ्याच पैकी ट्रेंड मध्ये आहे. प्रत्येक जण स्टीलच्या भांड्यांना ...

रोग प्रतिकारक शक्ती बळकट करण्यासाठी या 5 गोष्टी वापरा

रोग प्रतिकारक शक्ती बळकट करण्यासाठी  या 5 गोष्टी वापरा
आजच्या युगात रोगराही वाढली आहे की कधीही आपल्याला बळी बनवू शकते आणि जेव्हा पासून कोरोना ...