गुरूवार, 1 डिसेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified सोमवार, 18 मे 2020 (14:02 IST)

रिंकू राजगुरुला अभ्यासाची गोडी, लॉकडाऊनमुळे काळजीत

तरुण आणि सर्वांची लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरुचं करिअर उंची गाठत असलं तरी अभ्यासाची काळजी वाटते. सध्या लॉकडाउनमुळे ती आपल्या होमटाउन सोलापुरच्या अकलुज येथे अडकलेली आहे. परीक्षा टळणार या वारंवार येत असलेल्या बातम्यांमुळे ती काळजीत आहे. 
 
रिंकू म्हणते की परीक्षा स्थगित होणार असे ऐकू येत आहे परंतू आमची सर्व तयारी आहे पण आता काय होईल सांगता येत नाही. या क्षणी काहीही सांगता येत नाही की नवीन सत्र सुरू झाल्यावर परिस्थिती कशी असणार. 
 
रिंकूने 2016 साली धमाकेदार फिल्म सैराट याहून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. आता ती स्टार झाली आहे असे म्हणायला हरकत नाही कारण आता रिंकू नागराजच्या एक आणखी चित्रपट  'झुंड' मध्ये महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. 
 
अमिताभसोबत काम करत असली तरी तिला शिक्षणाची गोडी दिसून येते. ती म्हणते की माझ्या आई-वडिलांची इच्छा आहे की दुसरे कामं सुरू करण्यापूर्वी मी आपलं शिक्षण पूर्ण करायला हवे. म्हणून अभ्यासाकडे दुर्लक्ष करून मी अभिनयावर अधिक लक्ष घालू शकत नाही. 
 
अलीकडेच रिंकू राजगुरु हॉटस्टारच्या वेब सीरीज 'हंड्रेड' यात लारा दत्ता सोबत दिसली. रुचि नारायणच्या दिग्दर्शनात तयार या मालिकेत तिने मराठी मुलीची भूमिका निभावली आहे.