शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: सोमवार, 2 मार्च 2020 (11:46 IST)

स्टाफ सिलेक्शनच्या 1300 हून अधिक पदांसाठी भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने फेज 8 च्या भरतीकरिता अधिसूचना जारी केली आहे. या टप्प्यात एकूण 1300 हून अधिक पदे भरली जाणार आहेत. यात DEO, क्लर्क, UDC, उपनिरीक्षक, कनिष्ठ संगणक, इन्स्ट्रक्टर (स्टेनोग्राफी) लॅब असिस्टंट, ऑफिस अटेंडंट, टेक्निकल ऑपरेटर, स्टोअर कीपर पासून डायटिशीअनपर्यंत विविध पदांसाठी भरती होत आहे.
 
इच्छुक उमेदवारांनी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 20 मार्च 2020 पर्यंत आहे. इच्छुकांना केंद्र सरकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन (कर्मचारी निवड आयोग)च्या प्रादेशिक/उपप्रादेशिक कार्यालयांमध्ये अधिक माहितीसाठी संपर्क साधता येईल.
 
थेट लिंक पुढीलप्रमाणे पाहता येईल -
https://ssc.nic.in Candidates Dashboard
Latest Notification Phase-VIII/2020/Selection
Posts Post Details Link
 
महत्त्वाच्या तारखा -
ऑनलाइन अर्ज - 20 मार्च 2020 पर्यंत  
अर्ज करण्याची अंतिम मुदत - 20 मार्च 2020 रात्री 23.59 वाजेपर्यंत
ऑनलाइन शुल्क भरण्याची अखेरची मुदत - 23 मार्च 2020 रात्री 23.59 वाजेपर्यंत
ऑफलाइन चलान भरण्याची अंतिम मुदत - 23 मार्च 2020 रात्री 23.59 वाजेपर्यंत  
चलानच्या माध्यमातून पेमेंट करण्याची अखेरची मुदत - 25 मार्च 2020 (कार्यलयीन वेळेत)
संगणकीकृत परीक्षेच्या तारखा - 10 जून 2020 ते 12 जून 2020
शुल्क किती ?
शुल्क 100 रुपये आहे. महिला उमेदवार, एससी, एसटी, दिवंग, एक्स सर्व्हिसमेन यांना शुल्कातून सवलत देण्यात आली आहे.
पेमेंट कसे करायचे?
BHIM² UPI, नेटबँकिंग, डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा स्टेट बँक ऑफ इंडियातून चलानच्या माध्यमातून शुल्क भरता येईल.
प्रत्येक पदाच्या कॅटेगरीसाठी वेगळा अर्ज करायचा आहे.