शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Updated : बुधवार, 22 जानेवारी 2020 (11:39 IST)

गुड न्युज : मुंबई महापालिकेत मेगा भरती

मुंबई महापालिकेत चतुर्थ श्रेणीतील कामगार आणि कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीनंतर आता लवकरच कार्यकारी साहाय्यक पदासाठी मेगा भरती होणार आहे. ८१० रिक्त पदांसाठी Online परीक्षा घेऊन ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या पदासाठी सुमारे एक लाखाहून अधिक अर्ज येण्याची शक्यता आहे. 
 
कार्यकारी साहाय्यक वर्गासाठी (लिपिक) एकूण ५२५५ पदे आहेत. त्या पदांपैकी सरळसेवा पद्धतीने ३२२१ पदे भरण्यात येणार आहेत़ त्यातील सरळसेवेपैकी रिक्त असलेली ८१० पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. ही पदे भरण्यासाठी महाOnline लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीच्या माध्यमातून या पदांची भरती सरळसेवेत करण्यासाठी Online अर्ज मागवणे, संगणक ज्ञानाची परीक्षा आणि बहुपर्यायी वस्तुनिष्ठ Online परीक्षेसह इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची Online व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे.
 
सर्व उमेदवारांचे  ऑनलाइन पद्धतीचे अर्ज मागवण्यासाठी अर्जाचा नमुना महाऑनलाइनच्या महा रिक्रुटमेंट या संकेतस्थळावर अपलोड केले जाणार आहे. याची लिंक महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करून Online अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
 
या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकडून प्रत्येकी ९०० रुपये तर मागासवर्गीय व इतर मागास प्रवर्गातील उमदेवारांकडून प्रत्येकी ७०० रुपये शुल्क घेतले जाणार आहे़