गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: सोमवार, 16 डिसेंबर 2019 (16:38 IST)

नृत्याची आवड असेल तर...

If you like dance ...
तुम्हाला नाचायला आवडतं का? तुमच्या नाचाचं कौतुक होतं का? तुम्ही डान्स क्लासला जाता का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 'हो' असतील तर तुम्ही नृत्यातही करिअर करू शकता. कथक, भरतनाट्यम, कुचिपुडी, ओडिसी हे शास्त्रीय नृत्याचे प्रकार आहेत. ही नृत्यं शिकण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर तुम्ही शास्त्रीय नृत्यात निपुण होता. यासोबतच पाश्चात्त्य नृत्य, चित्रपटांवरच्या गाण्यांवरचं नृत्य, झुंबा डान्स असे प्रकारही प्रचलित आहेत. यासोबतच विविध प्रांतांची लोकनृत्यही आहेत. नृत्यकलेचा समावेश परफॉर्मिंग आर्टस्‌मध्ये होतो. नृत्यकलेत प्रावीण्य मिळवण्यासाठी तुम्हाला संगीताची आवड असायला हवी. ताल, सूर, ठेका यांची जाण असायला हवी. नृत्याप्रती झपाटलेपण हवं. नृत्यावर आधारित रिअ‍ॅलिटी शोजमुळे आज अनेकांना व्यासपीठ मिळू लागलं आहे. 
 
नृत्यकलेच्या आवडीच्या बळावर या क्षेत्रात करिअर करता येईल. मात्र प्रशिक्षण तसंच पदवीमुळे तुम्हाला बर्‍याच संधी खुल्या होतील. विविध संस्था नृत्याचं प्रशिक्षण देतात. नृत्याचं प्रशिक्षण घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. पुरेशा अनुभवानंतर स्वतःची प्रशिक्षण संस्थाही काढू शकता. 
 
आरती देशपांड