1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , सोमवार, 9 सप्टेंबर 2019 (10:23 IST)

स्टाफ सिलेक्शन परीक्षेत आढळला ‘मुन्नाभाई’

'Munnabhai' found in Staff Selection Exam
नेहरूनगरच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) मैदानावर सुरू असलेल्या उमेदवार भरती प्रक्रीयेत अॉनलाईन लेखी परीक्षेत ‘मुन्नाभाई’ अर्थात डमी उमेदवार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल हे निमलष्करी दल आहे. नाशिकरोड परिसरात भारत प्रतिभूती मुद्रणालय, चलार्थपत्र मुद्रणालयाच्या सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफकडे आहे. येथील मैदानावर स्टाफ सिलेक्शन कॉन्स्टेबलची भरती प्रकीया राबविली जात आहे. या भरतीप्रक्रियेअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या लेखी परिक्षेत डमी उमेदवार आढळून आल्याने कमान्डंट परमजित सिंग (रा.नेहरूनगर), यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
 
त्यांच्या फिर्यादीनुसार संशयित उमेदवार अनिकेत कैलास जाधव (२१, रा भोकरदन, जि.बुलढाणा) याच्यासह त्याचा साथीदाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव याने आॅनलाइन पध्दतीने घेतल्या जाणा-या लेखी परिक्षेसाठी त्याच्या वतीने डमी उमेदवार बसविल्याचा प्रकार उघडकीस आल्याने त्याच्यासह त्या डमी उमेदवाराविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.