रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मोदींचा नागपूर दौरा रद्द हे आहे कारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दिवसभर महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान ते नागपूर, औरंगाबाद आणि मुंबईत विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार होते, मात्र  नागपुरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे मोदींचा दौरा रद्द करण्यात आला आहे. नागपुरात मोदींकडून मेट्रोचं लोकार्पण केलं जाणार होते, दौरा रद्द झाल्याच्या वृत्ताला भाजपकडूनही सांगण्यात आले आहे. मोदी फक्त औरंगाबाद आणि मुंबईतील कार्यक्रमालाच हजेरी लावतील. तर दुसरीकडे मुंबईत मोदींच्या हस्ते मेट्रो प्रकल्प भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार असून, मात्र पत्रिकेत नावाचा उल्लेख नसल्याबद्दल शिवसेना खासदार राहुल शेवाळे हे नाराज झाले आहेत. बीकेसी येथे होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं भूमीपूजन केलं जाणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण पत्रिकेत स्थान आहे.