सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019 (16:33 IST)

अरे देवा कोल्हापूर - सांगली येथे पुन्हा पूर स्थिती पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली, ४२ बंधारे पाण्याखाली

नुकतेच महापुरातून सावरत असलेल्या कोल्हापूर सांगली जिल्ह्याला पुन्हा पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा नद्यांची पातळी वाढली असून, अनेक बंधारे बुडाले आहेत. तर गावांचा संपर्क देखील तुटला आहे. कोल्हापुरात येथे मागील तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर अजूनही ओसरत नाहीये. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फुटांवर गेली असून, 42 बंधारे पाण्याखाली गेले सोबतच  60 पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.
 
त्यामुळे या गावांची वाहतूक पर्यायी वळवली आहे, दोन दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज देखील हवामान दिला आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील तिन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे.  राधानगरी धरणातून 8540 क्यूसेक, दूधगंगा 11900 क्यूसेक तर तुळशी धरणातून 1011 क्यूसेकने विसर्ग सुरु आहे. पावसाचा जोर असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा प्रशासन तयार झाले असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे प्रशासनाने कळवले आहे.