मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019 (10:45 IST)

काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सनसनाटी आरोप, सुप्रिया सुळे यांचा फोन उचलला नाही

सध्या राज्यातील राजकारण तापू लागले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस सर्वाधिक फटका बसलेला पक्ष आहे. त्यात आता काँग्रेस नेते सुद्धा राष्ट्रवादीवर टीका करत  आहेत.काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सनसनाटी आरोप केले. पण या आरोपाबद्दल आपल्याला वाईट वाटल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे  यांनी म्हटल आहे. त्यांचे भाषण ऐकल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांना फोन केला, पण फोन लागला नाही. त्यामुळे एका जबाबदार व्यक्तीकडे निरोप दिला आहे, माझा निरोप त्यांच्यापर्यंत जाईल, असंही सुप्रिया सुळे  म्हणाल्या आहेत. 
 
हर्षवर्धन पाटलांनी पुढील राजकीय वाटचाल ठरवण्यासाठी इंदापुरात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर दगाबाजी केल्याचा आरोप केला होता, 2009 ला उमेदवारी मागे घे असं सांगण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोन केला. नंतर एक फोन करुन उमेदवारी मागे घेऊ नको, असं सांगितलं. हेच का राष्ट्रवादीचं राजकारण, असा सवाल हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला आहे.
 
हर्षवर्धन पाटलांच्या आरोपांवर  शरद पवार यांच्या कन्या व राष्ट्रवादीच्या नेत्या  सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांच्या भाषणाबद्दल वाचून वाईट वाटलं आणि आश्चर्यही वाटलं. कारण, इंदापूरच्या जागेबाबत अजून चर्चाही झालेली नाही. तीन ते चार दिवसांपूर्वी गणपती दर्शनाच्या निमित्ताने भेट झाली होती. भाषणानंतर मी फोन करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा फोन आजही लागत नाही. त्यामुळे एका जबाबदार व्यक्तीकडे निरोप दिलाय.