1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 सप्टेंबर 2019 (16:02 IST)

मनसे नेते नितीन सरदेसाई यांची ईडीकडून चौकशी

MNS leader Nitin Sardesai investigated by ED
कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) चौकशीसाठी मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई गुरूवारी दुपारी ईडीच्या कार्यालयात दाखल हजर झाले आहेत.
 
अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) सरकारी क्षेत्रातील कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियर सर्व्हिसेसद्वारे (आयएलएफएस) मुंबईतील ‘कोहिनूर सीटीएनएल’ कंपनीला दिलेल्या ८६० कोटी रूपयांचे कर्ज आणि गुंतवणूक प्रकरणात तपास करत आहे. शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशीच्या मालकीची ‘कोहिनूर सीटीएनएल’ दादरमधील ‘सेना भवन’ समोरील ‘कोहिनूर स्क्वेअर’ हा जुळ्या टॉवर्सचा प्रकल्प उभारत होती.